Devendra Fadnavis : काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis : काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : राम मंदिराचा (Ram Mandir)लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे. त्यांना आनंदच नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra FadnavisDevendra Fadnavis : ऑनलाइन फ्रॉड हाणून पाडणार; फडणवीसांनी सांगितलं सरकारचं प्लॅनिंग !)यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. असं आहे की, राम मंदिर बनतंय हे जनतेनं पैसा दिला म्हणून बनत आहे. पंतप्रधान मोदींनी पहिल्या दिवशीच सांगितलं आहे की, सरकारच्या पैशानं हे राम मंदिर बनत नाही. हे जनतेचं मंदिर आहे. आणि जनतेच्या पैशातून बनलं आहे. कारण लोकांचं रामावर प्रेम आहे. आता काही लोकं अशा लोकांसोबत आहेत, ज्यांनी रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, न्यायालयातही जाणार; खरेदी विक्री संघाचा कारभार ढाकणेंच्या रडारवर

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अयोध्येत त्यादरम्यान मोठा सोहळा होणार आहे. काही लोकांनी राम होते का? त्यांचा जन्म झाला होता का? असं विचारणारे देखील लोकं होते. काही म्हणायचे की मंदिर वहीं बनाऐंगे पर तारीख नहीं बताऐंगे. आता त्या ठिकाणी मंदिरही बनलं आहे. आणि तारीख देखील सांगितली आहे. आता निमंत्रणही येईल. ज्यांना यायचं त्यांनी यावं, दर्शन घ्यावं. कोणाला जर राम मंदिराचं दुःख होणार असेल तर मी त्याच्यावर काहीच करु शकत नाही, त्याचा मला खेद वाटतो.

भारताला पुन्हा धक्का : कतारमधील नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना तीन ते 25 वर्षांचा तुरुंगवास?

मला तर वाटतं हा जनतेचा कार्यक्रम आहे. जे काही प्रमुख लोकं आहेत त्यांना निमंत्रण मिळतील. ज्यांना नाही मिळणार त्यांनी नंतर जाऊन दर्शन घ्यावं. त्यामुळे निमंत्रण हा काही मोठा विषय नाही, असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमच्यासाठी राम मंदिर हा विषय राजकारणाच्या पलिकडचा आहे.

आता 500 वर्षापासून जो संघर्ष सुरु होता त्याला एक मंजिल मिळाली आहे. राम मंदिर होणे या संघर्षाची इतिश्री आहे. या देशातून राम लोकांच्या मनातून तुम्ही काढूच शकत नाहीत. प्रभू श्रीराम हे मनामनात,रक्तारक्तात सगळ्यांच्या डोक्यात आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी देखील ते निघू शकत नाही. राम उत्सव हा ऑरगनाईझ करावा लागत नाही लोकं उस्फुर्तपणे करतात.

निमंत्रण येवो या ना येवो पण राम मंदिर हा जो जो हिंदू आहे त्याच्यासाठी आनंदाचा सण आहे. आमच्यासाठी राम मंदिर हा विषय राजकारणापलिकडे आहे. राम मंदिर हा राजकारणाचा निवडणूकीचा विषय नाही. गुलीमीचे प्रतिक हटवून भारताने आपली जी संस्कृती आहे ती त्या ठिकाणी स्थापन केली आहे, असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube