Disqualification MLA : लवाद अन् आरोपींची दोनवेळा भेट; उद्धव ठाकरेंनी भेटीचा पुरावाच दाखवला

Disqualification MLA :  लवाद अन् आरोपींची दोनवेळा भेट; उद्धव ठाकरेंनी भेटीचा पुरावाच दाखवला

Udhav Thackeray News : शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाचा (Disqualification Mla) निकाल अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपलेला असतानाच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली. या भेटीवरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहेत. लवाद (राहुल नार्वेकर) अन् आरोपींची (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) दोनवेळा भेट झाली असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यासंदर्भातील पुराव्याचा कागदच ठाकरेंनी यावेळी माध्यमांना दाखवला आहे.

Krishna- Ayesha Shroff: ‘आई अन् लेकीच्या प्रश्नांची गुगली, असा रंगला धमाल रॅपिड फायर…

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात याआधी कधीच असं घडलं नव्हतं, हे आता सगळंच उघड उघड सुरु आहेत. लवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आरोपी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनवेळा भेट झाली आहे. पहिली भेट ही 18 ऑक्टोबरला आणि आत्ता दुसरी भेट झाल्याचा पुरावाच उद्धव ठाकरेंनी यावेळी दाखवला आहे. यावेळी पुरावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि नार्वेकरांच्या भेटीबाबतच्या बातम्याच वाचून दाखवल्या आहेत.

Ahmednagar News : निवडणुकांच्या तोंडावर विखेंकडून निधी मंजुरीचा धडाका; जिल्हा विकासासाठी 630 कोटी मंजूर

न्यायमूर्ती असं आरोपींना भेटू शकतो का? न्यायमूर्तीचा आरोपीला दोनदा भेटत आहेत. 18 ऑक्टोबरला एकदा त्यानंतर आता पुन्हा भेटत आहेत. असं होतं असेल तर कोणत्या निकालाचाी अपेक्षा आम्ही करावी? असा प्रश्नदेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

ज्येष्ठ घटनातज्ज्ञ बापटांची मुलाखत ऐका :
अपात्र आमदार प्रकणावर ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत नोंदवलं आहे. माध्यमांसमोर त्यांनी मुलाखत दिली आहे. ही मुलाखत राज्यातील सर्वच जनेतेने पाहावी, मुलाखतीत बापट म्हणतात, अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल हा दोन महिन्यांत लागला पाहिजे होता पण या खटल्याला तब्बल दोन वर्ष लागली आहेत. म्हणजेच वेळकाढूणा चालला आहे. कदाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर दबाव असेल किंवा ते कार्यक्षम नसतील असा अर्थ आपण काढू शकतो, असं बापटांनी स्पष्ट केल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या राज्यात सुरु असलेल्या घडामोडी पाहुन लोकशाहीचा खून होत असल्याचं वाटत आहे. आम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयात नमूद केलं असून आज जनतेच्या न्यायालयातही आम्ही नमूद करत आहोत. शेवटी आम्ही जनतेच्या न्यायालयात लढणारी लोकं असल्याची टीप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube