Eknath Shinde : खोट्याच्या कपाळी गोटा; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात…

Eknath Shinde : खोट्याच्या कपाळी गोटा; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात…

Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोट्याच्या कपाळी गोटा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)घणाघाती टीका केली आहे. खोटं बोलून ज्यांनी भाजपा-शिवसेना (BJP-Shiv Sena alliance)ही नैसर्गिक युती तोडली, खोटं बोलून ज्यांनी आपल्याच लोकांचा विश्वासघात केला. खोटं बोलून ज्यांनी हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते पुण्यातील खेडमध्ये आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या शिवसंकल्प अभियानात (Shivsankalp Abhiyan)बोलत होते.

टोल वसुली रद्द करा, अन्यथा पंतप्रधानांचे काळे गुलाबांनी स्वागत करू, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. यावेळी ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यात रायरेश्वराच्या मंदिरात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला, त्याच पुणे जिल्ह्यात आपण शिवसंकल्प अभियानाचा आपण शुभारंभ करत आहोत.

शरद मोहोळचा गेम कसा झाला? पोलिसांनी सांगितली ए टू झेड माहिती

कोणताही संकल्प पूर्ण करायचा असल्यास त्याला जिद्द लागते, कष्ट लागतात, मेहनत लागते आणि निर्धार लागतो. तो निर्धार करण्यासाठी सर्व शक्ती झोकून देऊन एक वृत्ती लागते.

शिवसैनिक म्हटलं की, पडेल ते काम मनापासून करायचं ही आपल्यााला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आहे. त्यांनी आपल्याला लढाऊ बाणा दिला. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण दिली. सर्वसामान्यांसाठी संघर्ष करण्याची शिकवण दिली.

बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा हाच खरा वारसा आहे. हे लक्षात ठेवून आपल्याला प्रत्येक आंदोलन असेल, निवडणूका यामध्ये उतरावं लागेल. त्याला आपण सुरुवात केली आहे.

शिवसेनेमध्ये इतर पक्षांमधून येणाऱ्यांची रोज जढाओढ लागली आहे. जर आपण चुकीचं पाऊल उचललं असतं तर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले असते का? असाही सवाल उपस्थित केला. आपण जी भूमिका घेतली ती प्रामाणिकपणे शिवसेनेला वाचवण्यासाठी, शिवसेनेचं खच्चीकरण थांबवण्यासाठी घेतली. मला कधीच पदाचा मोह नव्हता आणि नाही असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज