Krishna- Ayesha Shroff: ‘आई अन् लेकीच्या प्रश्नांची गुगली, असा रंगला धमाल रॅपिड फायर…

Krishna- Ayesha Shroff: ‘आई अन् लेकीच्या प्रश्नांची गुगली, असा रंगला धमाल रॅपिड फायर…

Krishna Shroff Ayesha Shroff: जॅकी श्रॉफ याची लेक कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff ) ही नेहमीच चर्चेत असते. कृष्णा श्रॉफ ही बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांपासून तशी दूर आहे. तरीही कृष्णा श्रॉफ हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही पाहायला मिळते. तसेच तिची आई आयेशा श्रॉफ (Ayesha Shroff) देखील ही तिच्या काळातील अभिनेत्री आणि मॉडेल होती. लहान वयातच ती जॅकी श्रॉफच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्न केले. लग्नानंतर आयेशा मोठ्या पडद्यापासून दूर राहिली होती. अलीकडेच आई आणि लेकीच्या मुलाखतीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

उद्योजक आणि स्टाईल आयकॉन कृष्णा श्रॉफ हिने अलीकडेच तिच्या YouTube चॅनेलवर तिच्या आई सोबत म्हणजे आयेशा श्रॉफ यांची मुलाखत घेतली आहे. तिने तिची आई आयशा श्रॉफ हिच्यासोबत रॅपिड-फायरचा धमाल खेळ खेळला आहे. यामध्ये फिटनेस आणि चैतन्यशील व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाने तिच्या यूट्यूब चॅनलवर तिच्या आईला मजेदार, झटपट प्रश्न विचारले आहेत. या मुलाखतीत आई आणि लेकीच्या जोरदार गप्पा अनुभवयाला मिळाले आहे.

कृष्णाच्या चॅनेलमध्ये फिटनेसवर भर दिल्याचे बघायला मिळत आहे, पण हा एपिसोड कमालीचा रंगला आहे. आयशा श्रॉफ, एक यशस्वी निर्माती आणि तिच्या मुलीसारखी फिटनेस उत्साही आहे हे यातून दिसून येत आहे. रॅपिड-फायर सेशन फक्त मजा करण्यापुरतेच नव्हते तर यातून चाहत्यांना कृष्णा आणि आयशा यांच्यातील अस्सल नातेसंबंध बघायला मिळाले आहे.

‘एका माकडाने काढले दुकान’ गाण्यावर किंग खानच्या लेकीचा डान्स, व्हिडीओ पाहून सलील कुलकर्णी म्हणाले…

आयेशा श्रॉफ या सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबतचे फोटो त्या सोशल मीडियावर कायम शेअर करत असतात. आयेशा श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. टायगर हा त्याच्या फिटनेसमुळे आणि चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. टायगरचा चाहता वर्ग मोठा आहे. टायगरनं हिरोपंती या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube