उध्दव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता एन.डी. स्टुडिओ, त्यासाठी देसाईंना धमक्या; नितेश राणेंचा गौप्यस्फोट
Nitesh Rane On Uddhav Thackeray : कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटू लागलेत. काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका केली. सनी देओलचे घर वाचवले, मग हाच न्याय नितीन देसाईंना का मिळाला नाही, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, त्यांच्या या टीकेनंतर आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. देसाईंचा एन.डी. स्टुडिओ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरेंना हवा होता, असा आरोप त्यांनी केला.
आज नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी सामनातून केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, नितीन हे देसाई चांगले व्यक्ती होते. मेहनती होते. त्यांच्याशी माझे चांगले संबंध होते. त्यांचा स्टुडिओ त्यांनी विकत द्यावा आणि तो आम्हाला द्यावा, असा कुणाचा तरी दबाव त्यांच्यावर होता. माझ्या माहितीनुसाार, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना देसाईंचा स्टुडिओ हवा होता. त्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला होता. देसाई यांना मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून धमक्या येत होत्या, असा गंभीर आरोप राणेंनी केला.
पुण्यात अजित पवारच ‘दादा’; प्रशासकीय बैठकांचा धडाका : चंद्रकांत उरले नावालाच पालकमंत्री!
राणे म्हणाले, आम्हाला देसाईंच्या मृत्यूचं राजकारण करायचं नाही. मात्र, संजय राऊत आम्हाला तोंड उघाडला लावतात. आम्हाला तोंड उघडायला लावलं तर संजय राऊतांच्या मालकाचं आम्ही वस्त्रहरणं करणार, असा इशाराही त्यांनी दिला.
राऊत यांचा मालक आणि त्यांची मालकीण यांच्याकडून एन.डी. स्डुडिओ बळकावण्याचे प्रयत्न सुरू होते. जो ठाकरे सिनेमा आला होता, त्याचे शूटिंग एन डी स्टुडिओत झालं त्याचे पैसे तरी दिलेत का? याचं स्पष्टीकरणं राऊतांनी द्यावं, मेलेल्या माणसांच्या मृत्यूचं राजकारण करणं हा राऊतांचा धंदा आहे, अशी टीका त्यांनी केली.
काल हिंगोलीच्या सभेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना कलंक, फडतुस, थापाड्या असं संबोधल. शिंदे गटावरही बोचरी टीका केली होती. यावर बोलतांना राणे म्हणाले, मी उद्धव ठाकरे याला नपुसक म्हंटल तर राग येईल, बायल्या म्हटलं तर बोभाटा होणार. त्याला फावड्या म्हटलं तरी राग येईल. त्यांचा पक्ष, चिन्ह तरी त्यांच्याकडे आहे का? स्वतःच्या वडिलांना हे आणि याचं कुटूंब म्हातारा आणि कुत्रा म्हणायचे. बाळासाहेब ठाकरे यांनी जे रुद्राक्ष घातलं, ते यांनी फेकून दिले. हा माणूस हिदुत्वाचा सुर्याजी पिसाळ आहे, अशी टीका त्यांनी केली.