कृष्णा-गोदावरी खोऱ्यात पहिल्यांदाच मिळालं इंधन तेल, भारत सरकारला मोठं यश
Krishna-Godavari basin : भारत महासत्ता होण्याच्या व्हिजनला बळ देणारी मोठी बातमी समोर आली आहे. कृष्णा-गोदावरी खोऱ्यात (Krishna Godavari) तेल (Petrol) आणि वायूचे (Natural Gas) मोठे साठे आढळून आले आहेत. हे साठे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. निसर्गाच्या या देणगीमुळे देशाची ऊर्जेची भूक भागवण्यात मोठी मदत होणार आहे.
बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असलेल्या खोल पाण्याच्या KG-DWN-98/2 ब्लॉकमधून “प्रथम तेल” उत्पादन सुरू झाले आहे. आंध्र प्रदेशच्या काकीनाडा किनाऱ्यापासून 30 किलोमीटर अंतरावर 7 जानेवारीला इंधन तेल काढण्यात आले आहे. याबाबत भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट केले की अभिनंदन भारत, ONGC जीतेगा तो भारत जीतेगा! पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे जात आहे. कृष्ण-गोदावरीच्या सर्वात खोल पाण्यातून आपले ऊर्जे उत्पादन देखील वाढणार आहे. बंगालच्या उपसागराच्या किनार्याजवळ असलेल्या खोल पाण्याच्या KG-DWN-98/2 ब्लॉकमधून “पहिले तेल” उत्पादन सुरू होते.
Land For Job Scam : ‘ईडी’कडून पहिलं आरोपपत्र दाखल, राबडी देवींसह मीसा भारतींचं नाव
त्यातून दररोज 45,000 बॅरल तेल आणि दररोज 10 दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त गॅस निर्मिती अपेक्षित आहे. यामुळे ऊर्जेच्या उत्पादनात हातभार लागेल. आत्मनिर्भर भारत या प्रकल्पामुळे सध्याचे राष्ट्रीय तेल उत्पादन 7% आणि राष्ट्रीय नैसर्गिक वायू उत्पादनात 7% ने वाढ अपेक्षित आहे.
बधाई भारत! #ONGCJeetegaToBharatJeetega!
As India powers ahead as the fastest growing economy under leadership of PM @NarendraModi Ji, our energy production is also set to rise from the deepest frontiers of #KrishnaGodavari
“First Oil” production commences from the complex &… pic.twitter.com/gN2iPSs0YZ
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) January 7, 2024
केंद्रीय मंत्र्यांच्या या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले, भारताच्या ऊर्जा प्रवासातील हे एक उल्लेखनीय पाऊल आहे आणि आपल्या आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला चालना देते. यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेलाही अनेक फायदे होतील.
Rajasthan Elections: नवीन वर्षात भाजपला मीठाचा खडा, 10 दिवसांतच द्यावा लागला मंत्र्याला राजीनामा
दरम्यान, हा प्रोजेक्ट 2017-18 मध्ये सुरु करण्यात आला होता पण कोरोना काळात अनेक अडथळे आले होते. सध्या 26 विहिरीपैकी 4 विहिरी पूर्ण क्षमतेने सक्रीय आहेत.