Rajasthan Elections: नवीन वर्षात भाजपला मीठाचा खडा, 10 दिवसांतच द्यावा लागला मंत्र्याला राजीनामा
Karanpur Assembly Elections : राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Assembly Elections) भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर नवीन वर्षात मात्र मोठा धक्का बसला आहे. एका मंत्र्याला अवघ्या 10 दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्याचे कारण म्हणजे मंत्र्याचा विधानसभा निवडणुकीतील पराभव. निवडणुकीपूर्वी एखाद्या उमेदवाराला मंत्री करणे आणि त्याचा पराभव होणे ही राजस्थानच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
करणपूर विधानसभा निवडणुकीत (Karanpur Assembly Elections) पराभूत झालेले मंत्री आहेत भाजपचे उमेदवार सुरेंद्र पाल सिंग टीटी. टीटी यांचा काँग्रेस पक्षाचे उमेदवार रुपिंदर सिंग कुन्नर यांनी 11,283 मतांनी पराभव केला. मंत्री झाल्यानंतरही टीटींच्या दारुण पराभवाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
काँग्रेस पक्षाने माजी आमदार गुरमीत सिंग कुन्नर यांचे पुत्र रुपिंदर सिंग कुन्नर यांना उमेदवारी दिली होती. अशा स्थितीत करणपूरमध्ये काँग्रेसला जनतेची सहानुभूती मिळण्याची भीती भाजपला आधीपासूनच होती. शेतकरी आंदोलनाचाही प्रभाव तिथे दिसून आला. मात्र, भाजपने कोणत्याही नव्या चेहऱ्याला संधी देण्याऐवजी टीटींवरच विश्वास व्यक्त केला. निवडणुकीपूर्वी भाजपनेही टीटी यांना राजस्थान सरकारमध्ये मंत्री केले, जेणेकरून त्याचा फायदा निवडणूक निकालात होऊ शकेल, परंतु तसे झाले नाही.
नार्वेकर-शिंदे भेट धक्कादायक, CM शिंदे अपात्र झाले तर पुढं काय? उल्हास बापटांनी नियमच सांगितला
10 दिवसांत मंत्रिपद ते कार्यकर्ता प्रवास
मंत्री बनल्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच टीटी यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आणि दहाव्या दिवशीच पराभव झाल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, सुरेंद्र पाल सिंग यांना पक्षात चांगले स्थान आहे. 1994 मध्ये सुरेंद्र पाल सिंग टीटी यांना सरकारमध्ये वेअरहाऊसिंगचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. हा दर्जा कॅबिनेट मंत्र्याच्या बरोबरीचा होता. इथून पक्षात टीटींचा उंची वाढत गेली. त्यानंतर ते विधानसभा निवडणुकीत उतरले होते. सरकार स्थापनेनंतर 2003 मध्ये त्यांना कृषिमंत्री करण्यात आले होते.
2013 मध्ये त्यांना पुन्हा खनिज आणि पेट्रोलियम मंत्री करण्यात आले. 2018 मध्ये ते निवडणुकीत वाईटरित्या पराभूत झाले होते, तरीही पक्षाने 2024 च्या निवडणुकीत विश्वास व्यक्त केला आणि त्यांना पुन्हा तिकीट दिले.
अजितदादांचा खांदा, भाजपवर निशाणा; मोरारजी देसाईंचा संदर्भ देत पवारांनी सांगितली कार्यक्षमता
चट मंत्री, पट राजीनामा… आता टीटींचे पुढे काय होणार?
सुरेंद्र पाल सिंग टीटी हे भाजपचे लढवय्ये कार्यकर्ते आहेत, मात्र निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना कोणतेही मोठे पद देऊ नये, अशी मागणी होत आहे. श्रीगंगानगरमध्ये पक्ष नव्या चेहऱ्यांला संधी देऊ शकतो. पक्षाला गेल्या अनेक वर्षांपासून बदल हवा होता. पण टीटींच्या बंडाची भीती कायम होती.
त्यानंतर श्रीगंगानगर जिल्ह्यात काँग्रेसने नव्या चेहऱ्यांवर दाव लावला आणि विजय मिळवला. त्यामुळे भाजपही नव्या चेहऱ्यांवर दाव लावणार आहे. आता कोणत्याही मंडळात किंवा महामंडळात टीटींऐवजी भाजप इतर जिल्ह्यांचा शीख चेहरा पुढे करू शकते.