नार्वेकर-शिंदे भेट धक्कादायक, CM शिंदे अपात्र झाले तर पुढं काय? उल्हास बापटांनी नियमच सांगितला

नार्वेकर-शिंदे भेट धक्कादायक, CM शिंदे अपात्र झाले तर पुढं काय? उल्हास बापटांनी नियमच सांगितला

MLA Disqualification Case : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे शिवसेना (Rahul Narvekar) आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी (MLA Disqualification Case) सुरू आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या मुदतवाढीचा उद्या अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उद्या या प्रकरणाचा निकाल येईल असे सांगण्यात येत आहे. या परिस्थितीत आमदार अपात्रतेच्या अनुषंगाने ज्या राजकीय घडामोडी घडून गेल्या आणि सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यावर ज्येष्ठ घटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट यांनी भाष्य केले आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अत्यंत कडक शब्दांत त्यांनी ताशेरे ओढले. काल विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे तर धक्कादायक आहे आणि घटनेच्या कुठल्याच नैतिकतेत बसत नाही अशा शब्दांत त्यांनी अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली.

Disqualification MLA : निकालाआधीच राहुल नार्वेकर CM शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण

उल्हास बापट यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत सत्ताधारी कसे चुकीचे वागत आहेत याचा खुलासा केला. बापट पुढे म्हणाले, आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे आणि यात जेव्हा पंतप्रधान शक्तिशाली होतात तेव्हा या लोकशाही चे रूपांतर प्राईम मिनिस्ट्रियल सिस्टीममध्ये होतं. शक्तिशाली पंतप्रधान असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग काय आणि सुप्रीम कोर्ट काय यांच्या संदर्भात असलेली विश्वासार्हता कमी होत चालली आहे. त्यामुळे अँटी डिफेक्शन कायदा मजबूत करण्याची गरज असल्याचे मत बापट यांनी व्यक्त केले.

सुप्रीम कोर्टाचे काही मुद्दे मला पटलेले नाहीत. रिजनेबल टाइम म्हणजे तीन महिने होतो पण आता ८ महिने झाले तरी सुद्धा निकाल दिलेला नाही. यावरून असे दिसते की विधानसभा अध्यक्ष यांच्यावर दबाव आहे किंवा हे अध्यक्ष अकार्यक्षम तरी आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात अध्यक्ष उद्या काय निर्णय देतील काही सांगू शकत नाही. राहुल नार्वेकर यांनी मीडियायासमोर बोलायचे नाही हा पहिला नियम आहे. हे कुठल्या अधिकाराने प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत, असा सवाल बापट यांनी केला.

शेवटच्या दिवसात गिरीश बापट काय बोलायचे, स्वरदा बापट पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या

जर आमदार अपात्र झाले तर पुढं काय ?

हा निर्णय जर कोणाच्याही विरोधात गेला तरी सुप्रीम कोर्टात जाता येणार आहे. पण कोर्ट सुद्धा लवकर निर्णय देणार नाही त्याला दोन महिने तरी लागतील आणि तेवढ्या वेळात निवडणुका येतील. त्यामुळे आता जनताच ठरवेल शिंदे बरोबर होते की उद्धव ठाकरे. जर आमदार अपात्र झाले तर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत. जर हे सरकार पडलं तर हा प्रश्न राज्यपाल यांच्याकडे जाईल की दुसरा कुणी व्यक्ती आहे का ज्याच्याकडे बहुमत आहे. कुणालाच जर बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकते, असे उल्हास बापट म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube