शेवटच्या दिवसात गिरीश बापट काय बोलायचे, स्वरदा बापट पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या…

शेवटच्या दिवसात गिरीश बापट काय बोलायचे, स्वरदा बापट पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या…

Pune Loksbha By Election : दिवंगत खासदार गिरीश बापट आयसीयुमध्ये असतानाही शेवटच्या दिवसापर्यंत काम करीत असल्याचं मी डोळ्याने पाहिलं असल्याचं स्वरदा बापट यांनी सांगितलं आहे. लेट्अप मराठीशी बोलताना त्यांना शेवटच्या दिवसात गिरीश बापट काय बोलायचे, असं विचारण्यात आलं असता पहिल्यांदाच त्या स्पष्ट बोलल्या आहेत. यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्या शेवटच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे.

Pune Loksabha By Election : ..तर स्वरदा बापट पुणे लोकसभा पूर्ण ताकदीने लढवणार

स्वरदा बापट म्हणाल्या, गिरीश बापट यांची प्रकृती खालावत चालली होती. मंगेशकर रुग्णालायत आयसीयुमध्ये ते होते. त्याचं निधन 29 तारखेला झालं, पण 28 तारखेपर्यंत त्यांचे स्वीय सहाय्यक पेपर्स घेऊन बापट यांच्याकडे सह्या घेण्यासाठी येत असल्याचं स्वरदा बापट यांनी सांगितलं आहे.

तसेच गिरीश बापट यांनी शेवटच्या दिवसांत खूप त्रास होत होता, तरीही त्यांनी शेवटपर्यंत काम केलं आहे. गिरीश बापट अविश्वसनीय काम करीत असल्याचं स्वरदा बापट यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीविषयी भाष्य केलं आहे.

कोल्हापूर हादरलं! करणीचा संशय; जेवायला बसलेल्या शेजाऱ्यावर तलवारीने सपासप वार

त्या म्हणाल्या, सेल्फ लास्टचं उत्तम उदाहरण म्हणजे गिरीश बापट आहेत, त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे येणार आहे. तसेच जशी कसब्याची निवडणूक झालीय तशाच दोन निवडणुका एकसारख्या कधीच होणार नाहीत. त्यामुळे कसब्यासारखी परिस्थिती पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत होईल, असं मला वाटत नसल्याचं स्वरदा बापट यांनी स्पष्ट केलं आहे.

Nashik APMC : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीला स्थगिती देणाऱ्या शिंदे सरकारच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमच्यासोबत आहेत, असा मेसेज देण्यासाठी घरी आले असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी बोलताना स्वरदा बापटांनी कसबा पेठ निवडणुकीत गिरीश बापटांना प्रचारासाठी मैदानात उतरवण्यात आलं होतं. त्यावरही स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

गिरीश बापट यांनी आमच्यासह पक्षातील नेते प्रचारासाठी बाहेर पडू नका, असं सांगण्यात येत होतं. मात्र, त्यांच्या मनातला कार्यकर्ता आणि पक्षासाठी असलेली निष्ठा मोठी होती. त्यामुळे त्यांनी शारिरिक परिस्थितीकडे न पाहता शेवटच्या क्षणापर्यंत पक्षासाठी काम केलं असल्याचं विधान स्वरदा बापट यांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube