काँग्रेसचं ठरलं! अशोक गहलोत, सचिन पायलटांवर ‘ही’ मोठी जबाबदारी…

काँग्रेसचं ठरलं! अशोक गहलोत, सचिन पायलटांवर ‘ही’ मोठी जबाबदारी…

Congress : राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूका (Assembly Election) जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून दहा नेत्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आलीयं. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, (Ashok Gehlot) सचिन पायलट, माजी केंद्रीय मंत्री अजय माकन आणि पंजाबचे वरिष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग बाजवा यांच्यासह इतर सात जणांवर वरिष्ठ निरीक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आलीयं. यासंदर्भातील एक पत्रक काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अशोक गहलत, अजय माकन, प्रताप बाजवा यांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्त केलं.

लोकसभा निवडणुकीसाठीही अशोक गहलोत यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी अमेठी मतदारसंघात विशेष निरीक्षक म्हणून काम पाहिलं होतं. याच मतदारसंघात भाजपच्या दिग्गज नेत्यांना काँग्रेसने धक्का दिला होता. त्यानंतर आता गहलोत यांच्यासह जी. परमेश्वरा यांच्यावर मुंबईसह कोकण विभागात वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलंय.

भारत सरकारचा मोठा निर्णय, 6 कॅनडा उच्चायुक्तांची हकालपट्टी, ‘या’ दिवसापर्यंत देश सोडण्याचे आदेश

तर विदर्भासाठी भुपेश बघेल, चरणजित सिंह चन्नी, उमंग सिंगर, मराठवाड्याची जबाबदारी सचिन पायलट, उत्तम कुमार रेड्डी, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी टी.एस. सिंगदेव, एम.बी. पाटील आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सय्यद हुसेन, अनुसया सीताक्का यांच्यावर देण्यात आलीयं.

मर्दानी खूब लड़ी! हरमनप्रीत कौरची मिताली राजच्या विक्रमाशी बरोबरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झुंजार खेळी

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असून काँग्रेसकडूनही रणनीती आखण्यात येत आहे. निवडणूक आयोगाकडून आज दुपारनंतर निवडणूकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी सर्वच पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे निरीक्षक कशी भूमिका बजावणार? काँग्रेसला लोकसभेला जसं यश मिळालं तसंच यश विधानसभेलाही मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे निवडणुकीच्या निकालानंतरच मिळणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube