भारत सरकारचा मोठा निर्णय, 6 कॅनडा उच्चायुक्तांची हकालपट्टी, ‘या’ दिवसापर्यंत देश सोडण्याचे आदेश

  • Written By: Published:
भारत सरकारचा मोठा निर्णय, 6 कॅनडा उच्चायुक्तांची हकालपट्टी, ‘या’ दिवसापर्यंत देश सोडण्याचे आदेश

India Canada Dispute : हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येवरून सध्या भारत आणि कॅनडामध्ये (India Canada Dispute) मोठा वाद निमार्ण झाला आहे. या प्रकरणात भारताने मोठा निर्णय घेत आता कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांना 19 ऑक्टोबर पर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहे.

तर यापूर्वी या प्रकरणात कॅनडाने नवीन आरोप केल्यानंतर भारताने मोठा निर्णय घेत भारतीय उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचे आदेश दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडातील भारतीय राजदूतांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत भारताने उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना परत बोलावले आहे. अतिरेकी आणि हिंसाचाराच्या वातावरणात ट्रूडो सरकारच्या कृतींमुळे त्यांची सुरक्षा धोक्यात आली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

हरदीपसिंग निज्जर प्रकरणावरून भारताने सोमवारी कॅनडाच्या राजदूताला बोलावले होते. या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, कॅनडातील भारतीय उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करणे  पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि अतिरेकी आणि हिंसाचाराच्या वातावरणात ट्रूडो सरकारच्या कृतींमुळे त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. तसेच त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सध्याच्या कॅनेडियन सरकारच्या वचनबद्धतेवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे भारत सरकारने उच्चायुक्त आणि इतर लक्ष्यित मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताविरुद्ध अतिरेकी, हिंसाचार आणि फुटीरतावादाला ट्रूडो सरकारच्या समर्थनाला प्रतिसाद म्हणून पुढील पावले उचलण्याचा अधिकार भारत राखून ठेवतो, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

कॅनडाचे राजदूत काय म्हणाले?

भारताने घेतलेल्या या निर्णयानंतर कॅनडाचे उच्चायुक्त स्टीवर्ट व्हीलर यांनी माध्यमांशी बोलताना कॅनडाने भारत सरकारचे एजंट आणि कॅनडाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकाची हत्या यांच्यातील संबंधांचे विश्वसनीय, अकाट्य पुरावे दिले आहेत. आता भारताने आपल्या वचनाचे पालन करण्याची आणि त्या सर्व आरोपांची चौकशी करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाणे आपल्या देशाचे आणि आपल्या देशातील लोकांचे हित आहे. कॅनडा भारताला सहकार्य करण्यास तयार आहे. असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. भारत सरकारने खालील 6 कॅनडाच्या मुत्सद्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभेपूर्वी अजित पवारांना पुन्हा धक्का, आमदार दीपक चव्हाण शरद पवारांच्या पक्षात

स्टीवर्ट रॉस व्हीलर, कार्यवाहक उच्चायुक्त

पॅट्रिक हेबर्ट, उपउच्चायुक्त

मेरी कॅथरीन जोली, प्रथम सचिव

लॅन रॉस डेव्हिड ट्राइट्स, प्रथम सचिव

ॲडम जेम्स चुइप्का, प्रथम सचिव

पॉला ओरजुएला, प्रथम सचिव

follow us
  • fb
  • instagram
  • youtube