भारत-कॅनडा संबंध पूर्वपदावर येणार; आधी आरोप, आता नरमले

भारत-कॅनडा संबंध पूर्वपदावर येणार; आधी आरोप, आता नरमले

India-Canada conflict : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील (India-Canada conflict) राजकीय संबंध ताणले आहेत. याला कारण ठरले होते खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) मृत्यूचे. या हत्येमागे भारत असल्याचा कॅनडाचा आरोप होता. परंतु हे आरोप भारताने फेटाळून लावले होते. यामुळे दोन्ही देशातील संबंधांमध्येही कटुता दिसून आली होती.

कॅनडाच्या सरकारने खलिस्तान समर्थक नेता हरदीप सिंह निज्जर याच्या साथीदारावर झालेल्या हल्ल्यामागे कोणत्याही परकीय शक्तीचा हस्तक्षेप नसल्याचे म्हटले आहे. गेल्या मंगळवारी (20 फेब्रुवारी), कॅनेडियन कायद्याची अंमलबजावणी करून एक निवेदन जारी करण्यात आले होते. या निवेदनात म्हटले होते की, रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांच्या सरे टीमने माहिती दिली की घटनेच्या वेळी हे प्रकरण परदेशी देशाच्या हस्तक्षेपाशी संबंधित असल्याची शक्यता होती. परंतु तपास केला असता या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही परकीय हस्तक्षेपाची पुष्टी झाली नाही.

यशस्वी जैस्वालला द्विशतकांचा डबल फायदा, कसोटी क्रमवारीत मोठी झेप; टॉप-5 मध्ये 3 भारतीय

यापूर्वी, सिख फॉर जस्टिस (SFJ) गटाने 1 फेब्रुवारीला सकाळी सिमरनजीत सिंग यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. ग्रेटर टोरंटो एरिया (जीटीए) येथे 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यासाठी एसएफजेने भारताला जबाबदार धरले होते. या हल्ल्यात इंद्रजित सिंग गोसल यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. इंद्रजीतवर खलिस्तान समर्थक असल्याचा आरोप होता.

चंदीगड : विनोद तावडेंची सलग तिसऱ्या वर्षी चालाखी… पण सर्वोच्च न्यायालयाने डाव उधळला!

दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची 18 जून 2023 रोजी कॅनडातील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या प्रकरणावर भारताला लक्ष केले होते. त्यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचा आरोप भारतीय हेरांवर केला होता. मात्र, भारताने कॅनडाचे हे आरोप ठामपणे फेटाळून लावले होते.

Ameen Sayani : ‘बिनाका गीतमाला’ फेमस करणारे कोण होते अमीन सयानी?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube