Ameen Sayani : ‘बिनाका गीतमाला’ फेमस करणारे कोण होते अमीन सयानी?
Ameen Sayani Life Journey : प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी (Ameen Sayani ) यांचे वयाच्या 91 वर्षी निधन झाले आहे. तमाम देशवासीयांच्या भावना सयानी यांच्याशी निगडित होत्या. त्यांचा बिनाका गीतमाला हा शो खूप गाजला होता. सयानी केवळ लोकप्रिय निवेदक नव्हते तर, त्यांचे बॉलीवूड इंडस्ट्रीतही वेगळी ओळख होती. त्यांच्या निधनामुळे श्रोते आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पण आताच्या पिढीला अमीन सयानी नेमके कोण होते याबद्दल फारशी माहिती नाहीये त्यांच्याबद्दल थोडक्यात घेतलेला आढावा.
Maylek : आई अन् मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’, नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!
अमीन सयानी यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत झाला. अमीन सयानी यांची रेडिओच्या जगाशी ओळख त्यांचे भाऊ हमीद सयानी यांनी केली. कारकिर्दीची पहिली 10 वर्षे त्यांनी इंग्रजी कार्यक्रम केले. ऑल इंडिया रेडिओ प्रत्येक घराघरात लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते.
बॉलीवूड चित्रपटांमध्येही दाखवली झलक
अमीन सयानी यांनी त्यांच्या केवळ पडद्यामागील आवाजानेच श्रोत्यांचे मनोरंजक केले असे नाही तर त्यांनी बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येही काम केले होते. तीन देवियां, भूत बांगला, कतला आणि बॉक्सर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची झलक दाखवली होती. या चित्रपटांमध्ये सयानी हे एखाद्या शोचे प्रेझेंटर म्हणून दिसून आले.
सागरिका घोष यांच्या खासदारकीने राजदीप सरदेसाईंची संपत्ती उघड; डोळे फिरवणारी कोट्यावधींची कमाई
अनेक स्टार्ससोबत जवळचे संबंध
अमीन सयानी अनेक प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सशी जोडले गेले होते. सयानी राज कपूर यांना शालेय दिवसांपासून ओळखत होते असे सांगितले जाते. याशिवाय त्यांचे मुकेश यांच्याशीदेखील चांगले संबंध होते ते गायक मुकेश यांना सर्वात दयाळू व्यक्ती मानत. याशिवाय गायक किशोर कुमार यांच्यासोबतही त्यांची बॉन्डिंग चांगली होती. किशोरदा म्हणजे न सुटलेले कोडं असे सयानी म्हणत असत. सयानी यांना गायक व्हायचे होते याचमुळे त्यांचे गायकांशी अधिक जवळचे नाते होते.
पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांवर उमटवली मोहोर
अमीन सयानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारही जिंकले. 2009 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. याशिवाय 1992 मध्ये त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हर्टायझर्सने 1991 मध्ये त्यांना सुवर्णपदकही देण्यात आले होते.