बारामती नगराध्यक्ष पदासाठी जय आणि युगेंद्र पवार आमने-सामने? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच
Supriya Sule यांनी बारामती नगराध्यपदासाठी जय पवार उतरणारअसल्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देत युगेंद्र पवार निवडणूक लढणार नाही, असं सांगितलं.
Jai and Yugendra Pawar face to face for the post of Baramati Mayor? Supriya Sule clearly stated : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामध्ये आता प्रत्यक्ष निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान राज्यामध्ये काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी मात्र सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यात आता अजित पवारांच्या चिरंजीव जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आज नगर परिषद आणि पंचायतींच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज रात्रीपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. यावर शरद पवार गटाच्या खासदार आणि जय पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
जय पवार हे निवडणूक लढवणार म्हटल्यावर बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणता उमेदवार समोर येतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अजित पवारांनी बंड केल्यानंतर ज्या काही लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुका झाल्या त्या सर्व पवार विरूद्ध पवार आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. त्यात पक्षाची पक्ष बांधणी बारामती मध्ये युगेंद्र पवार यांच्याकडून केली जात आहे त्यामुळे ते देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यावर स्पष्टीकरण देत बारामतीची निवडणूक युगेंद्र पवार लढणार नाही. असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे बारामतीमध्ये जय यांचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसत आहे.
प्रदीप गारटकरांचा अजितदादांना राम-राम; बंडाला शिवसेना-भाजप अन् शरद पवार गटाचीही साथ?
तसेच पुढे सुळे म्हणाल्या की, जिथं जिथे इच्छुक आहेत. तिथे आम्ही पूर्ण ताकदीने लढू. आज रात्रीपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी आघाड्या आणि युती झालेल्या आहेत. बारामतीची निवडणूक युगेंद्र पवार लढणार नाही. अजित पवारांशी कोणत्याच बाबतीत बोलणे झालेले नाही. अनेक ठिकाणी पदाधिकारी नेते भेटले काही ठिकाणी राजकीय चर्चा झाली. विकासासाठी कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा असं पवार साहेबांनी संगितले आहे.
त्या अगोदर अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांनी देखील निवडणुकीमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता जय पवार देखील बारामती नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे बारामती नगरपरिषद अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. कारण या नगर परिषदेमध्ये स्वतः शरद पवार यांचं वर्चस्व आहे. याच नगर परिषदेमध्ये जय पवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. जय पवार यांच्या बद्दल सांगायचं झालं तर विधानसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये ते प्रचंड ऍक्टिव्ह होते. फ्रंट फूट राहून प्रचार करत होते. त्यानंतर आता ते स्वतः निवडणूक लढण्याची शक्यता आहे. जय पवार हे आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे देखील उमेदवार असू शकतात. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची ही तयारी असल्याचे बोलले जात आहे.
