Canada : खलिस्तानी हरदीप निज्जरच्या समर्थकांच्या घरावर गोळीबार, भारत-कॅनडा पुन्हा भिडणार?
hardeep singh nijjar friend house shooting : गेल्या वर्षी जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची (Hardeep Singh Nijjar) कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आता हरदीपसिंह निज्जरच्या जवळच्या मित्राच्या घरावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ब्रिटिश कोलंबिया पोलीस (British Columbia Police) या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, ब्रिटिश कोलंबियातील सिमरनजीत सिंग (Simranjit Singh) यांच्या घरी गुरुवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 1.20 वाजता गोळीबार झाला.
IND vs ENG : श्रेयस-रोहितचं बॅडलक पण, यशस्वीचं झुंजार शतक; दुसऱ्या सामन्यात फलंदाजांचं वर्चस्व
सहा वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली
ब्रिटिश कोलंबिया गुरुद्वारा कौन्सिलच्या प्रवक्त्याने सांगितले की, ज्या घरात गोळीबार झाला ते घर हरदीप सिंह निज्जरचा मित्र सिमरनजीत सिंग यांचे आहे. पोलिसांनी शेजारी आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. घराबाहेर उभ्या असलेल्या कारवर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या, त्यामुळे कारचे नुकसान झाले. घरावरही अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेचा तपास सुरू असून या घटनेमागचे कारण अद्याप समोर आले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गुरुद्वारा परिषदेचे प्रवक्ते मोनिंदर सिंग म्हणतात की या गोळीबाराच्या घटनेचा हरदीप सिंह निज्जर खून प्रकरणाशी संबंध असू शकतो. या गोळीबारात सिमरनजीत सिंग यांची सहा वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली. मोनिंदरने २६ जानेवारी रोजी व्हँकुव्हरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाबाहेर खलिस्तान समर्थक निदर्शने आयोजित करण्यात मदत केल्याचा दावा केला होता.
‘आत्ताचे लवंडे कुठेही जातील त्याचा पत्ता नाही’; आघाडीत जाणार का? विचारताच ठाकरे कडाडले
निज्जर हत्या प्रकरणामुळे भारत-कॅनडा संबंध बिघडले
हरदीपसिंग निज्जर यांची गेल्या वर्षी जूनमध्ये सरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हरदीपसिंग निज्जरला भारताने खलिस्तानी दहशतवादी घोषित केले होते. हरदीप निज्जरच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. कारण, हरदीप निज्जरच्या हत्येत भारताचा हात असू शकतो, असा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत केला होता. ट्रूडो यांनी भारताला तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. मात्र, भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांचे दावे फेटाळून लावले होते.