कॅनडा पोलिसांचा खुलासा, निज्जरचे मारेकरी कॅनडामध्येच लपलेले, लवकरच अटक होण्याची शक्यता

  • Written By: Published:
कॅनडा पोलिसांचा खुलासा, निज्जरचे मारेकरी कॅनडामध्येच लपलेले, लवकरच अटक होण्याची शक्यता

Hardeep Singh Nijjar Killing : भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. निज्जरची गोळ्या झाडून हत्या करणारे आरोपी कॅनडामध्ये आहे. कॅनडाच्या ‘द ग्लोब अँड मेल’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, खलिस्तानी दहशतवादी निज्जरची हत्या करणाऱ्या दोघांनी अद्याप कॅनडा (Canada) सोडला नाही. त्यांना अधिकारी लवकरच अटक करू शकतात.

Rajasthan : पहिलं आश्वासन पूर्ण; नव्या वर्षात 450 रुपयांत मिळणार गॅस 

कॅनेडियन पोलिसांनी सांगितले की ते सध्या दोन पुरुषांवर लक्ष ठेवत आहेत, ज्यांच्यावर अधिकाऱ्यांना ब्रिटिश कोलंबियामध्ये निज्जरची हत्या केल्याचा संशयय आहे. द ग्लोब अँड मेलने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पुढील काही आठवड्यांत पोलिसांना या मारेकऱ्यांनाही पकडणे अपेक्षित आहे.

Thane News : ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब? पोलिसांना मिळाला मेल; बॉम्बस्कॉड घटनास्थळी 

हत्येनंतर मारेकरी कॅनडाला गेले नव्हते

कॅनेडियन मीडियाचा अहवाल आहे की तीन सुत्रांनी सांगितले आहे की निज्जरची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर संबंधित संशयित हत्यारे कॅनडाला गेले नाही. ते गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांच्या देखरेखीखाली आहेत.

द ग्लोब आणि मेलच्या अहवालानुसार, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (आरसीएमपी) येत्या आठवड्यात हत्यारांना अटक करेल आणि आरोप लावेल अशी शक्यता आहे. जेव्हा दोन संशयितांवर आरोप दाखल केले जातील, तेव्हा पोलिस कथित मारेकऱ्यांचा सहभाग आणि या प्रकरणात भारत सरकारच्या नेमका सहभाग आहे की नाही, याची माहिदी देतील. दरम्यान,

या दोन संशयितांच्या अटकेने ‘दूध का दूध और पानी का पानी’ होणार आहे. द ग्लोब अँड मेल हे कॅनडाचे पश्चिम आणि मध्य कॅनडातील पाच शहरांमधून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे.

ट्रुडो यांनी भारतावर आरोप केले होते

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रूडो यांनी सप्टेंबरमध्ये निज्जर यांच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. निज्जरची हत्या भारतीय दलालांनी केल्याचे त्यांनी म्हटले होते. भारताने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले होते. भारताने ट्रूडो यांचे विधान राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. या वर्षी १८ जून रोजी ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरातील गुरुद्वाराबाहेर हरदीपसिंग निज्जरची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube