कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

कॅनडा पोलिसांची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

Hardeep Singh Nijjar Murder: गेल्या वर्षी खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorist) नेता हरदीप सिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी (Canada Police) शुक्रवारी तीन भारतीयांना अटक केली. (Nijjar Murder Case) मिळालेल्या माहितीनुसार या लोकांचा भारत सरकारशी संबंध होता का याचा अधिक तपास सुरू आहे.

निज्जरची जूनमध्ये शीख लोकसंख्या असलेल्या सरेच्या व्हँकुव्हर उपनगरातील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारत सरकारवर या हत्येमध्ये हात असल्याचा आरोप लावण्यात आला. यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहे. भारताने ट्रुडोचे आरोप कोते असल्याचे सांगून फेटाळले होते. भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते.

तीनही आरोपी गेल्या काही वर्षांपासून कॅनडात होते

शुक्रवारी अटकेची घोषणा करताना, अधीक्षक मनदीप मुकर म्हणाले की, तीन संशयित आरोपी करण ब्रार (22 वर्षीय), कमल प्रीत सिंग (22 वर्षीय) आणि करण प्रीत सिंग (28 वर्षीय) आहेत. ते म्हणाले की तिघेही एडमंटन, अल्बर्टा येथे राहत होते जिथे त्यांना अटक करण्यात आली.

कांदा निर्यातबंदी उठली पण, निर्यात शुल्काचा भार कायम; महागाई नियंत्रणाचा सरकारी प्लॅन

कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार की, त्याच्यावर फर्स्ट-डिग्री हत्येचा तसेच हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. हे सर्वजण तीन ते पाच वर्षांपासून कॅनडात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, मुकर म्हणाले की, आम्ही त्याचे भारत सरकारशी संबंध असल्यास तपास करत आहोत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube