International Terrorist: दहशतवादी करणवीर सिंग विरोधात इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस

International Terrorist: दहशतवादी करणवीर सिंग विरोधात इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस

Babbar Khalsa International Terrorist: बब्बर खालसा इंटरनॅशनल या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य करणवीर सिंग (Karanveer Singh) याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस (Interpol Red Corner Notice) जारी केली आहे. 38 वर्षीय करणवीर सिंग हा मूळचा पंजाबमधील कपूरथला येथील आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पाकिस्तानमध्ये उपस्थित असू शकतो.

करणवीर सिंग हा बब्बर खालसा या दहशतवादी वाधवा सिंग आणि हरविंदर सिंग रिंडा यांचा उजवा हात असल्याचे सांगितले जाते. वाधवा आणि रिंडाही पाकिस्तानात लपून बसल्याचा संशय आहे.

त्याच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI सोबत कट रचत असल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करणवीर सिंगवर खून, स्फोटक कायदा, दहशतवादी फंडिंग, शस्त्रास्त्र कायदा आणि दहशतवादी कट रचण्याचे गुन्हे दाखल आहेत.

‘तेव्हाच’ आमदारांच्या पाठिंब्याने एनडीएमध्ये सहभागी झालो, प्रफुल पटेल यांचा दावा

रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यावर काय होते?
रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यामागील इंटरपोलचा मुख्य उद्देश सदस्य देशांच्या पोलिसांना सतर्क करणे हा आहे. जेणेकरुन फरार अथवा संशयित गुन्हेगारांना जेरबंद करता येईल किंवा फरार व्यक्तींबद्दल माहिती गोळा करता येईल. रेड कॉर्नर नोटीस हे कोणाच्याही विरुद्ध आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube