Thane News : ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब? पोलिसांना मिळाला मेल; बॉम्बस्कॉड घटनास्थळी
Thane News : बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्याच्या घटनांचं सत्र अद्यापही सुरुच आहे. आता ठाण्यातील सिनेगॉग चौकामध्ये ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी ईमेलवर मिळाली आहे. बॉम्ब ठेवल्याचा ईमेल मिळताच पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. पोलिस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले असून बॉम्बस्कॉडच्या माध्यमातून बॉम्ब शोधण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. अद्याप पोलिस यंत्रणेला बॉम्ब आढळून आला नसून बॉम्ब शोधण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली असून ठाण्यातील नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
Thane News : ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब? पोलिसांना मिळाला मेल; बॉम्बस्कॉड घटनास्थळी
ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर बॉम्ब ठेवल्याची माहिती कोणी दिलीयं. याचाही तपास पोलिस यंत्रणेकडून सुरु आहे. बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्यानंतर पोलिस आयुक्त, डीएसपी,एसपी घटनास्थळी दाखल झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली धार्मिक स्थळ परिसरात कसून तपासणी केली जात आहे. अचानक पोलिसांकडून बॉम्बस्कॉडच्या पथकांनी सिनेलॉग परिसरात धाव घेतल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे.
Bachhu Kadu : पवारांना निमंत्रण अन् बच्चू कडूंचा मविआमध्ये जाण्यास ग्रीन सिग्नल? पाहा फोटो
नूकतीच दिल्लीस्थित इस्त्राली दुतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर दुतावास कार्यालयाबाहेर एक पत्र आढळून आलं होतं. या पत्रामध्ये धमकी देण्यात आली होती. आरबीआयच्या ठिकाणांवर बॉम्ब ठेवण्यात आल्याचाही मेल RBI ला मिळाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेला धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल आला होता. त्यामध्ये काल (26 डिसेंबर) दुपारी दीड वाजता बॉम्ब ब्लास्ट होतील, असे म्हटले होते. यामध्ये खिलाफत इंडिया हे ईमेल अकाउंट वापरले होते. यानंतर पोलिसांनी या अनेक ठिकाणी शोधमोहीम केली होती. पण काहीही आक्षेपार्ह आढळून आलं नव्हतं. त्यानंतर एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.