Bachhu Kadu : पवारांना निमंत्रण अन् बच्चू कडूंचा मविआमध्ये जाण्यास ग्रीन सिग्नल? पाहा फोटो

1 / 6

Bachhu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू हे सत्तेत जरी असले तरी ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकनाथ शिंदे सरकारवर टीका करत असतात. सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा देत असतात. यावेळी देखील त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना घरी येण्याचं निमंत्रण दिलं. त्यामुळे बच्चू कडू आपली भूमिका बदलणार का? या चर्चांना उधान आले आहे.

2 / 6

मात्र यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत एक प्रकारे भाजपला सत्तेमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला. यावेळी ते म्हणाले की शिंदे मुख्यमंत्री नसतील तर आम्ही आमचा वेगळा निर्णय घेऊ. बच्चू कडू हे माध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांनी आम्हाला केलेल्या मदतीची जाणीव म्हणून ते या भागातून जात असताना आम्ही त्यांना घरी येण्याचे निमंत्रण दिलं आहे. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं.

3 / 6

मात्र मी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नसतील. तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ. असं म्हणत कडू यांनी भाजपला इशारा दिला आहे.

4 / 6

तसेच यावेळी पत्रकारांनी महाविकास आघाडीकडून बच्चू कडू यांना ऑफर दिल्यास ते महाविकास आघाडीमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू म्हणाले की, त्याप्रमाणे प्रत्येक जण स्वतःचं भलं बघतो. त्याप्रमाणे आम्ही देखील पाहणार आहोत.

5 / 6

त्यामुळे ज्या ठिकाणी आमचं राजकीय अस्तित्व मजबूत राहील. त्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ. असं म्हणत बच्चू कडू यांनी एक प्रकारे महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा ग्रीन सिग्नल दिला.

6 / 6

पण यावेळी त्यांनी आपल्या पाठिंबा एकनाथ शिंदे यांनाच असेल असेही अधोरेखित केलं. तसेच यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला किती जागा मिळाव्यात याबद्दल देखील आपेक्षा व्यक्त करून दाखवली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube