IND vs ENG : श्रेयस-रोहितचं बॅडलक पण, यशस्वीचं झुंजार शतक; दुसऱ्या सामन्यात फलंदाजांचं वर्चस्व

IND vs ENG : श्रेयस-रोहितचं बॅडलक पण, यशस्वीचं झुंजार शतक; दुसऱ्या सामन्यात फलंदाजांचं वर्चस्व

IND vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND vs ENG 2nd Test) आजपासून विशाखापट्टणम येथे सुरू झाला आहे. या सामन्यात आज पहिल्या दिवशी भारताचे फलंदाज चमकले. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. चहापानापर्यंत भारताने तीन विकेट्सच्या मोबदल्यात 225 धावा केल्या आहेत. सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) शानदार शतक ठोकर संघाच्या फलंदाजीला आकार दिला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा फार काही करू शकला नाही. 14 धावांवर असताना तो बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शोएब बशीरने रोहितला बाद करून पहिली विकेट घेतली. शुभमन गिल आज चांगला खेळत होता. परंतु, इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन त्याला 34 धावांवर असताना बाद केले. गिलने 46 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या.

IND Vs ENG: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज, स्टार सलामीवीराचे पुनरागमन निश्चित

भारताच्या 103 धावा झालेल्या असताना दोन विकेट पडल्या. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर मैदानावर आले. या दोघांमध्ये 90 धावांची भागादारी झाली. यामध्ये अय्यरच्या 27 धावा होत्या. यापुढे मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. दुसऱ्या बाजूला जैस्वालने मात्र धावफलक हलता ठेवला होता. श्रेयस बाद झाल्यानंतर रजत पाटीदार मैदानात आला.

इंग्लंडला दोन धक्के 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND vs ENG Test) उद्यापासून विशाखापट्टणम येथे सुरू झाला आहे. या सामन्याआधी टीम इंडियातील रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या (Team India) अडचणी वाढलेल्या असतानाच आता इंग्लंडलाही दोन मोठे धक्के बसले आहेत. संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज जॅक ली दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर होऊ शकतो. तसेच हॅरी ब्रूक या खेळाडूने वैयक्तिक कारणांमुळे या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. दुसऱ्या कसोटीआधी सरावासाठीही तो उपस्थित नव्हता. तर दुसरीकडे हॅरी ब्रूकनेही कसोटी मालिकेतून माघार घेत मायदेशाची वाट धरली आहे.

IND vs ENG : जडेजा-राहुलच्या जागी कोण?’या’ 3 खेळाडूंमध्ये स्पर्धा; लवकरच होणार घोषणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube