IND vs ENG : जडेजा-राहुलच्या जागी कोण? ‘या’ 3 खेळाडूंमध्ये स्पर्धा; लवकरच होणार घोषणा

IND vs ENG : जडेजा-राहुलच्या जागी कोण? ‘या’ 3 खेळाडूंमध्ये स्पर्धा; लवकरच होणार घोषणा

IND vs ENG 2nd Test : भारतीय संघाने पहिली कसोटी गमावल्यानंतर (IND vs ENG 2nd Test) आता येत्या 2 फेब्रुवारीपासून दुसरी कसोटी सुरू होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतींमुळे बाहेर पडले आहेत. आता या दोघांच्या जागी कुणाला संधी द्यायची असा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर उभा ठाकला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर होणार आहे. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा बाहेर पडल्यानंतर त्यांच्या जागी सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या तिघांना संधी मिळाली आहे. परंतु, या तिघांपैकी प्रत्यक्षात मैदानात कोण दिसेल हे अद्याप निश्चित नाही.

IND vs ENG : बीसीसीआयने वजनावरून हिणवलेला सर्फराज अखेर टीम इंडियात ! संघात दोन मोठे बदलही

दुसरीकडे विराट कोहली (Virat Kohli) देखील या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी रजत पाटीदारला (Rajat Patidar) घेण्यात आले आहे. रजत पाटीदार सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे कदाचित त्याला केएल राहुलच्या जागी घेतील अशी शक्यता आहे. तर रवींद्र जडेजाच्या गैरहजेरीत त्याच्या जागी कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) विचार केला जाऊ शकतो. या सामन्यासाठी टीम इंडियात 4 फिरकी गोलंदाज आणि 1 वेगवान गोलंदाला संधी दिली जाऊ शकते. या पद्धतीने निर्णय घेतला गेला तर सिराजला संधी मिळणार नाही त्याऐवजी कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर मैदानात दिसतील.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, सिराज, मुकेश कुमार, जसप्रित बुमराह, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार या खेळाडूंचा समावेश आहे.

IND vs ENG: ऑली पोपचं चिवट शतक! इंग्लड संघाचा जबरदस्त पलटवार, उडवली भारताची झोप

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज