KL Rahul: ‘जावयाला कुठे ठेवू आणि कुठे नको’; सुनिल अन् अथिया शेट्टीने केलं दणक्यात सेलिब्रेशन

KL Rahul: ‘जावयाला कुठे ठेवू आणि कुठे नको’; सुनिल अन् अथिया शेट्टीने केलं दणक्यात सेलिब्रेशन

KL Rahul: काल भारत आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) चांगलीच मॅच रंगली होती. कोणीही कल्पना केली नव्हती, अशी गोष्ट कालच्या मॅचमध्ये घडली. (Social media) ते म्हणजे सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) जावई के. एल. राहूलने (KL Rahul) शतक ठोकले आहे. गेल्या काही दिवसापासून के. एल. राहूल खराब फॉर्म मध्ये आहे, अशी जोरदार चर्चा सुरु होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)


परंतु काल के. एल. राहूलने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकून सर्वांचीच बोलती बंद केल्याचे बघायला मिळत आहे. के. एल. राहूलच्या सेंच्युरीमुळे सासरे सुनिल शेट्टी आणि पत्नी अथिया शेट्टी यांनी जोरदार सेलिब्रेशन केल्याचे बघायला मिळाले आहे. अथिया शेट्टीने पती आणि क्रिकेटर केएल राहुल शतक पूर्ण केल्यावर एक पोस्ट लिहिली आहे की, “काळी रात्रही संपेल आणि सूर्य उगवेल.. तु माझं सर्वस्व आहेस. मी तुझ्यावर प्रेम करते.” यावेळी सासरे सुनील शेट्टी याने देखील आपल्या भावना व्यक्त केल्याचे दिसत आहे. “एक उदात्त कामगिरी – विजयी परतावा. कृतज्ञता ओव्हरफ्लो. सर्व प्रयत्नांना सक्षम बनवल्याबद्दल सर्वशक्तिमान देवाचे आभार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)


एवढेच नाही तर बॉलिवूडच्या तमाम स्टार्सनी राहुलच्या विजयावर आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्याचेदिसत आहे. तसेच टीव्ही स्क्रीनवरील फोटोबरोबर त्याने शतकाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यावर प्रतिक्रिया देत असताना आयुष्मान खुरानाने लिहिले की, ‘किती अप्रतिम पुनरागमन….’

केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले आहे. परंतु अनेकवेळा दोघांच्या करिअरबद्दल कायम बोललं जातं. गेल्या काही दिवसापासून केएल राहुल एकही धाव न काढता बाद झाला होता. यामुळे त्याला लोकांच्या टिकेला कायम सामोरे जावे लागत होते. परंतु त्याने काल आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून सर्वांनाच थक्क केल्याचे बघायला मिळत आहे.

Box Office: ‘जवान’चा जलवा कायम… ५ दिवसात २७८ कोटींची कमाई; हे फक्त किंग खानच करू शकतो

लोकेश राहुलने १०६ चेंडूमध्ये १२ चौकार आणि २ षटकार ठोकले आणि १११ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला असल्याचे बघायला मिळाले आहे. तसेच विराट कोहलीने देखील नाबाद ९४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १२२ धावा केल्याचे दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube