Box Office: ‘जवान’चा जलवा कायम… ५ दिवसात २७८ कोटींची कमाई; हे फक्त किंग खानच करू शकतो

Box Office: ‘जवान’चा जलवा कायम… ५ दिवसात २७८ कोटींची कमाई; हे फक्त किंग खानच करू शकतो

Jawan Box Office Collection: बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करत असल्याचे दिसत आहे. या सिनेमाने पाचव्या दिवशी सोमवारी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे. रविवारी एका दिवसामध्ये सिनेमाने ७० कोटीचा गल्ला कमावला आहे. आता सोमवारी किती कमावले जाणून घेऊया…

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)


भारत आणि पाकिस्तान सामना सुरु असताना देखील चाहत्यांचा सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी सिनेमाने ३० कोटी रुपये कमावले आहे. सुट्टी नसल्याने सिनेमाच्या कमाईमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु हे सगळं खोटं ठरवत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली आहे. आतापर्यंत सिनेमाने २७८ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. आता लवकरच ३०० कोटीचा टप्पा पार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवान सिनेमा या आठवड्यामध्ये ‘गदर २’चा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. नफा कमावण्याच्या बाबतीत गदर २ हा सिनेमा सध्या समोर आहे. या सिनेमाचे बजेट ६० कोटी रुपयांचे होते आणि सिनेमाने ५०० कोटी कमावले आहे. जवान सिनेमाचे बजेट २०० कोटी रुपये आहे आणि चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटीच्या आसपास कमाई केल्याचे बघायला मिळत आहे.

एकीकडे ‘जवान’ कमाईचे झेंडे फडकावत आहेत. तर, दुसरीकडे किंग खान देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहिला आहे. किंग खानने या उदंड प्रतिसादासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘जवान’ला २ दिवसामध्ये मिळालेले यश बघून किंग खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट ट्विटमध्ये शेअर केल्याचे बघायला मिळाले होते.

Pushpa The Rule: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’

या सिनेमाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खानने केली आहे. सिनेमा ७ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रमुख भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. तसेच हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube