Pushpa The Rule: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’

Pushpa The Rule: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’

Pushpa 2 Release Date: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत असलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या सिनेमाची प्रदर्शनाची अखेर तारीख समोर आली आहे. (Social media) ‘पुष्पा २’ची प्रदर्शनाची तारीख आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे १५ ऑगस्ट २०२४ दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : द राइज’ अर्थात ‘पुष्पा १’ या सिनेमाला जगभरातून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळाले होते. हा त्याचा पहिला पॅन इंडिया सिनेमा होता. या सिनेमाची पटकथा, गाणी आणि अल्लू अर्जुनचा सिग्नेचर डायलॉग ‘मैं झुकेगा नही साला’ खूपच धुमाकूळ घातला होता. आता चाहते दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाच्या तारखेची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. निर्माते वेळोवेळी सिनेमाशी संबंधित अपडेट्स शेअर करत असतात.

गेल्या काही दिवसापासून या सिनेमातील अल्लू अर्जुनचा लूक आणि त्यानंतर टीझर प्रदर्शित करण्यात आला. तसेच काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाबरोबर सेटवरील एक फोटो देखील शेअर करण्यात आला होता. या सिनेमाचे शूटिंग आणखी सुरू आहे. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाच्या सुट्ट्यांसह लाँग वीकेंडचा मुहूर्त साधून प्रदर्शित होणारा ‘पुष्पा: द रूल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा नवा विक्रम करू शकणार आहे.

Fukrey 3 Song Out: कॉमेडी, ड्रामा ‘फुकरे 3’चं पहिलं गाणं प्रदर्शित

अल्लू अर्जुनला नुकत्याच पार पडलेल्या ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘पुष्पा’च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘पुष्पा २’च्या शूटिंगच्या दरम्यान अभिनेत्याची एक झलक देखील बघायला मिळाली होती. यामुळे चाहते खूप उत्साहित झाले आहेत. इंस्टाग्रामने त्यांच्या अधिकृत हँडलवर या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याचे एक दृश्य देखील दाखवले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube