Happy Birthday Virat Kohli : विराटचे 35 रेकॉर्ड्स! लवकरच सचिनचं ‘खास’ रेकॉर्डही तुटणार

Happy Birthday Virat Kohli : विराटचे 35 रेकॉर्ड्स! लवकरच सचिनचं ‘खास’ रेकॉर्डही तुटणार

Happy Birthday Virat Kohli : भारताचा यशस्वी खेळाडू आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Happy Birthday Virat Kohli) याचा आज वाढदिवस. विराट कोहली आज 35 वर्षांचा झाला. क्रिकेटच्या कारकीर्दीत त्याने टीम इंडियासाठी (Team India) त्याने अनेक मॅच विनिंग खेळी केल्या. अनेक रेकॉर्डही केले. मैदानावरील त्याची फलंदाजी, विकेट मिळाल्यानंतरचा त्याचा जल्लोष, अॅग्रेसिव्हपणा. या सगळ्याच गोष्टी क्रिकेट चाहत्यांना वेड लावणाऱ्या. कोहली (Virat Kohli) मैदानात असेल तर मॅच जिंकण्याची गॅरंटीच. अशी धारणा अनेकांची. त्याच्या क्रिकेट रेकॉर्ड्सवर नजर टाकली तर ही धारणी चुकीची नाही हेच दिसून येते. चला तर मग आज विराट कोहलीच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त त्याचे मैदानातील 35 रेकॉर्ड्सही जाणून घेऊ या..

भारतीय संघातील यशस्वी खेळाडूंपैकी एक नाव विराटचं आहे. विराटने आतापर्यंत अनेक रेकॉर्डस् केले आहेत. आज वाढदिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना तो दिसेल. आजच्या सामन्यात जर त्याने शतक केले तर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विक्रमाबरोबर बरोबरी होईल. वनडेत सर्वाधिक 49 शतके सचिनच्या नावावर आहेत. कोहली 48 शतकांसह एकच पाऊल मागे आहे. विराट कोहली हा फलंदाज म्हणूनच ओळखला जातो. मात्र, गोलंदाजीतही त्याने खास रेकॉर्ड केले आहे. टी 20 सामन्यात एकही बॉल न टाकता विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याच्या टी 20 करियरमधील पहिला चेंडू वाईड होता आणि या चेंडूवर इंग्लंडचा खेळाडू केविन पीटरसन स्टंप आऊट झाला होता.

World Cup 2023 : श्रीलंकेच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; आफ्रिकेचा संघ ठरला कारणीभूत

विराट कोहलीचे 35 रेकॉर्ड्स

1. टी 20 सामन्यात सर्वाधिक 4008 धावा करणारा फलंदाज.
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 205 डावात सर्वाधिक 10 हजार धावा.
2016,17 आणि 2018 या सलग तीन वर्षात 2500 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव फलंदाज.
कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके करणारा फलंदाज.
सर्वाधिक 20 प्लेयर ऑफ द सीरिज जिंकणारा खेळाडू.
एका वनडे मालिकेत सर्वाधिक 558 धावा करणारा फलंदाज.
टी 20 मध्ये सर्वाधिक 38 अर्धशतक करणारा खेळाडू.
टी 20 मध्ये सर्वाधिक 15 मॅन ऑफ द मॅच जिंकणारा खेळाडू.
टी 20 मध्ये चेंडू न टाकता विकेट घेणारा एकमेव खेळाडू.
सर्वात कमी 348 डावांत 49 शतके करणारा खेळाडू.
वनडेच लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक 26 शतके केली.
एका वर्षात सर्वात कमी 11 डावात एक हजार धावा करणारा खेळाडू.
सर्वात कमी 65 कसोटी डावांत 4000 धावा करणारा कर्णधार.
एका वर्षात सहा वनडे शतके करणारा एकमेव कर्णधार.
दहा हजार धावा करणाऱ्या खेळाडूंत 50 पेक्षा जास्त सरासरी राखणारा एकमेव खेळाडू.
कोणत्याही एका संघासाठी (आरसीबी) सहा शतके करणारा खेळाडू.
सहा हंगामात 500 पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव खेळाडू.
आयपीलएलच्या एका सत्रात सर्वाधिक 973 धावा करणारा फलंदाज.
आयपीलएलच्या एका सत्रात चार शतके करणारा फलंदाज.
सर्वाधिक सामने (308) जिंकणारा भारतीय.
सर्वाधिक 40 कसोटी सामने जिंकणारा कर्णधार.
कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक सात दुहेरी शतक करणारा फलंदाज.
एकदिवसीय सामन्यात (242) सर्वाधिक 12 हजार धावा करणारा फलंदाज.
भारतासाठी सर्वाधिक 68 कसोटी सामन्यात कप्तानी करणारा खेळाडू.
लक्ष्याचा पाठलाग करताना वनडे सर्वाधिक 66 ची सरासरी
सध्याच्या खेळाडूंत सर्वाधिक 78 शतक-अर्धशतक करणारा खेळाडू.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक 150 कॅच घेणारा भारतीय खेळाडू.
देशासाठी सर्वाधिक 20 प्लेयर ऑफ द सीरिज मान मिळवणारा खेळाडू.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक 58 सरासरी राखणारा खेळाडू.
एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगाने (267 सामने) 13 हजार धावा करणारा फलंदाज.
टी 20 मध्ये सर्वाधिक सात वेळेस प्लेयर ऑफ द सीरिज जिंकणारा खेळाडू.
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत 890 गुण मिळवणार पहिला भारतीय खेळाडू.
आयसीसी कसोटी क्रमवारीत 922 गुण मिळवणारा एकमेव खेळाडू.
दोन देशांविरुद्ध (वेस्टइंडिज, श्रीलंका) सलग तीन शतके करणारा पहिला खेळाडू.
सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube