IND vs ENG: ऑली पोपचं चिवट शतक! इंग्लड संघाचा जबरदस्त पलटवार, उडवली भारताची झोप
IND vs ENG 3rd Day Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. (IND vs ENG 3rd Day Highlights) तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ओलीच्या शतकाच्या जोरावर 316 धावा केल्या होत्या. (IND vs ENG) तर भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या फक्त 6 विकेट घेता आल्या आहेत. इंग्लंडकडून ओली पोप (Ollie Pope) 148 धावा आणि रेहान अहमद (Rehan Ahmed) 16 धावांसह खेळत आहेत. अशाप्रकारे संघाने आता भारतावर 126 धावांची आघाडी मिळवली आहे.
आता खेळाच्या चौथ्या दिवशी ऑली पोपला बाद करून इंग्लंडचा डाव लवकरात लवकर संपवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. कारण ही जोडी क्रीझवर राहिली तर टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या आघाडीचे फलंदाज पुन्हा एकदा फ्लॉप ठरले. सलामीवीर फलंदाज बेन डकेटने निश्चितपणे 47 धावांचे योगदान दिले आणि जॅक क्रोलीसोबत 45 धावांची भागीदारी केली.
मात्र यानंतर जो रूट, जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार बेन स्टोक्स स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. सतत पडणाऱ्या विकेट्समध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ओली पोपने जबाबदारी स्वीकारली आहे. ऑली पोपने बॅटिंग पार्टनर बेन फॉक्ससोबत 100 हून अधिक धावांची भागीदारी केली. यावेळी पोपनेही आपले शतक पूर्ण केले आहे. ऑली पोपचे कसोटी क्रिकेटमधील हे 5 वे शतक आहे.
बुमराह आणि अश्विनच्या नावे प्रत्येकी दोन विकेट्स: टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन बळी घेतले. याशिवाय पटेल आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली तर मोहम्मद सिराजला दुसऱ्या डावात एकही विकेट घेता आली नाही.
Shoaib Malik : शोएब मलिकने खरंच मॅच फिक्सिंग केली का? स्वतःच उत्तरही देऊन टाकलं
भारताचा पहिला डाव 436 धावांवर आटोपला: इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 436 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने पहिल्या डावात 190 धावांची आघाडी घेतली होती. भारतीय संघाकडून पहिल्या डावात तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यशस्वी जैस्वालने 74 चेंडूत 80 धावा केल्या. शिवाय केएल राहुलने 86 धावांचे योगदान दिले होते. तर रवींद्र जडेजा 87 धावा करून बाद झाला आहे.
इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हाती घेतला. प्रथम फलंदाजी करताना बेन स्टोक्सच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला अवघ्या 246 धावा करता आल्या.