Shoaib Malik : शोएब मलिकने खरंच मॅच फिक्सिंग केली का? स्वतःच उत्तरही देऊन टाकलं

Shoaib Malik : शोएब मलिकने खरंच मॅच फिक्सिंग केली का? स्वतःच उत्तरही देऊन टाकलं

Shoaib Malik : पाकिस्तानी संघाचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) आता नव्या वादात अडकला आहे. बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेतील एका सामन्यात शोएबने एकाच ओव्हरमध्ये तीन नोबॉल टाकले. त्यामुळे त्याच्यावर फिक्सिंगचे आरोप होत आहेत. क्रिकेट जगतात या प्रकणाची चांगलीच चर्चा सुरू असतानाच आता शोएब मलिकने या वादावर खुलासा केला आहे.

शोएब मलिकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने या प्रकाराबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेत फॉर्च्युन बारिशल संघाबाबत ज्या अफवा आणि चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्याबाबत मत व्यक्त करणार आहे. संघातून बाहेर पडण्याआधी मी कर्णधाराबरोबर बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर मी बांग्लादेश सोडला कारण मला दुबईला जायचं होतं. या पुढील सामन्यांसाठी मी संघाला शुभेच्छा देतो. आगामी काळात जर संघाला माझी गरज लागली तर मी मदत करण्यासाठी तत्पर असेल. परंतु, माझ्याबाबत अशा अफवा पसरवू नका. यामुळे एखाद्याची कारकिर्दही संपू शकते.

शोएब आणि सानिया ‘तलाक’ नाही तर ‘खुला’ प्रथेने झालेत वेगळे : नेमकी काय आहे ही पद्धत?

बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेतील एका सामन्यात शोएब मलिकने एकाच ओव्हरमध्ये सुरुवातीचे चार चेंडू व्यवस्थित टाकले पुढील दोन चेंडू टाकण्यासाठी मात्र 3 नो बॉल टाकले. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात असा प्रसंग पहिल्यांदाच घडला आहे. यानंतर क्रिकेट विश्वात नवा वाद सुरू झाला आहे. शोएब मलिकने मॅच फिक्सिंग केली असा आरोप त्याच्यावर होत आहे. हा वाद वाढत चालल्याचे लक्षात आल्यानंतर शोएब मलिकने हा खुलासा केला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून शोएब मलिक चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत भारताचा जावई अशी याची ओळख होती. 2010 मध्ये जेव्हा त्याने भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत (Saniya Mirza) निकाह केला. आता याच शोएब मलिकने तिसऱ्यांदा निकाह केला आहे.  यानंतर शोएब मलिक चांगलाच चर्चेत आहे.

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! PCB अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube