शोएब-सानियाच्या शाही विवाहानं सुरू झालं होतं भारत-पाकमधील चाहत्यांचं शीतयुद्ध

शोएब-सानियाच्या शाही विवाहानं सुरू झालं होतं भारत-पाकमधील चाहत्यांचं शीतयुद्ध

Saniya Mirza and Shoaib Malik : टेनिसपटू सानिया मिर्झाचा (Saniya Mirza) पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik ) पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी (Sana Javed) निकाह केला आहे. त्यामुळे सध्या सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट न देताच या दोघांचा विवाह झाला का? या चर्चांना उधान आलं. मात्र जेव्हा सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा निकाल झाला होता. तेव्हा देखील भारत आणि पाकिस्तान दोन्हीही देशांत गदरोळ झाला होता.

Ram Mandir : 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळा, प्राणप्रतिष्ठेविषयी विदेशी माध्यमांत नेमकी काय चर्चा?

याच कारण म्हणजे भारत-पाकिस्तानमधील ताणलेले संबंध त्यामुळे सानियाने अशाप्रकारे पाकिस्तानी व्यक्तीशी विवाह केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 12 एप्रिल 2010 ला हा विवाह अत्यंत शाही पद्धतीने झाला होता. हैदराबादमधील ताज हॉटेलमध्ये शोएब सानियाचा हा शाही विवाह पार पडला होता. या विवाहाचा फोटो वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर झळकला होता. या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. तसेच भारत पाकिस्तान यांच्यामधील राजकीय वाद आणि दोघांचेही क्रीडा क्षेत्रातील करियर या सर्वांचा विचार करत लग्नानंतर शोएब सानिया यांनी दुबईमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

Ayodhya : प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या ‘बातम्यांबाबत’ काळजी घ्या… मोदी सरकारची तंबी!

शोएब आणि सानिया हे पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये भेटले होते त्यानंतर काही काळ त्यांनी एकमेकांना डेट केलं. आणि 2010 मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शोएब मलिक मलिकचं हे दुसरे लग्न होतं. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव आएशा सिद्धीकी होतं. तिच्याशी घटस्फोटानंतर सानिया आणि शोएब च लग्न झालं होतं. त्यानंतर 2018 मध्ये शोएब आणि सानिया यांना एक मुलगाही झाला इजहान त्याचं नाव आहे. तर आता अभिनेत्री सना जावेद हिच्या सोबत शोएबने तिसरं लग्न केलं आहे.

Share Market : सेन्सेक्स 260 अंकांनी घसरला, निफ्टी 21600 च्या खाली, ‘या’ शेअर्समध्ये खरेदी…

दरम्यान शोएब मलिकचं तिसरं लग्न आणि सानिया शोएबचा घटस्फोट यावर सानिया मिर्झाचे वडील इमरान मिर्झा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, सानियाने शोएबला मुस्लिम पद्धतीमध्ये महिलेकडून पतीला दिल्या जाणाऱ्या घटस्फोटाची पद्धत खुला या पद्धतीने घटस्फोट दिला आहे . मात्र सानिया आणि शोएब या दोघांनीही आपल्या घटस्फोटाबद्दल गुप्तता बाळगली. मात्र सानियाने नुकतच इंस्टाग्रामवर घटस्फोटा बद्दल एक पोस्ट केली होती. यावरून याला दुजोरा मिळाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube