सानिया मिर्झाचा माजी पती शोएब मलिक… तिसरी पत्नी सना जावेदसोबत घटस्फोट घेण्याच्या मार्गावर

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचे माजी पती आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा चर्चेत आलाय.

Sania Mirza's Ex Husband

Shoaib Malik Headed For Divorce with third wife Sana Javed : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचे माजी पती आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा चर्चेत आलाय. काही वृत्तांनुसार, शोएब मलिक आपल्या तिसऱ्या पत्नी सना जावेदसोबतच्या लग्नात अडचणींमुळे घटस्फोटाच्या मार्गावर आहे. शोएब आणि सना यांनी जानेवारी 2024 मध्ये आपला निकाह जाहीर केला होती, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. शोएब आणि सानियाचा विवाह 14 वर्षे टिकला. त्यांना इज़यान नावाचा एक मुलगा आहे, जो सध्या दुबईमध्ये आपल्या आईसह राहतो.

लग्नानंतर चर्चा

शोएब (Shoaib Malik) आणि सना यांच्या (Sana Javed) लग्नानंतर दोघांनाही समाज माध्यमांवर टीका झेलावी लागली. जानेवारी 2024 मध्ये ऑनलाइन व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार, शोएब आणि सना एकमेकांना टाळताना दिसले. व्हिडिओमध्ये शोएब चाहत्यांच्या ऑटोग्राफवर लक्ष केंद्रित करत आहे. दोघांमध्ये संवाद होताना दिसत नाही.

काही नेटिझन्सना या जोडप्यामध्ये गंभीर समस्या असल्याचे (Sania Mirza‘s ex-husband) वाटते, तर काहींना फक्त सामान्य दांपत्य वाद असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत दोघांनीही या अफवांबाबत कोणतेही विधान केलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voice Of Netizens (@voiceofnetizens)

सानिया मिर्झा सोबत विवाह

शोएबचा सानिया मिर्झासोबतचा विवाह क्रॉस-बॉर्डर विवाह म्हणून चर्चेत होता, पण लवकरच 2024 मध्ये संपला. सानियाच्या कुटुंबाने सांगितले की, हे जोडपं काही महिन्यांपूर्वीच विभक्त झाले आहे. घटस्फोटाचे कारण कधीच सार्वजनिक करण्यात आले नाही, पण शोएबच्या विश्वासघाताच्या अफवा चर्चेत होत्या.

सानियासोबत घटस्फोट झाल्यानंतर लगेचच शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केल्याची घोषणा केली, ज्यामुळे दोन्ही देशातील चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि खळबळ उडाली. लग्नाच्या वेळेवरून असे गृहित धरले गेले की, शोएब आणि सना यांचा संबंध सानियासोबतच्या लग्नात असतानाच सुरू झाला होता. मात्र, दोघांनीही याबाबत कधीही सार्वजनिकपणे काहीही सांगितलेले नाही.

follow us