हो, ते दोघे वेगळे झालेत… पण आता त्यांच्या ‘खाजगीपणाचा’ सन्मान ठेवा : इम्रान मिर्झा

हो, ते दोघे वेगळे झालेत… पण आता त्यांच्या ‘खाजगीपणाचा’ सन्मान ठेवा : इम्रान मिर्झा

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik) पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी (Sana Javed) निकाह कुबूल केला आहे. त्याचा हा तिसरा निकाह असून याची भारतात जोरदार चर्चा होत आहे. याचे कारण त्याची दुसरी पत्नी आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा.  शोएब मलिकने सानियाशी तलाक न घेताच तिसरा निकाह केल्याची चर्चा आहे. कारण दोघांच्या तलाकच्या अधिकृत बातम्या कधीही समोर आल्या नव्हत्या. (Imran Mirza has shared a post on Instagram giving information about Sania and Shoaib’s relationship.)

मात्र या फोटोंनंतर काल (20 जानेवारी) सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ते तलाकमधून नाही तर ‘खुला’ प्रथेतून वेगळे झाले आहेत. मिर्झा यांची ही प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र याबाबत सानियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र आता तिच्या घरच्यांनीच तिच्यावतीने एक सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सानिया आणि शोएबच्या नात्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Instagram

 

यात म्हटले आहे की, “सानियाने तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच लोकांपासून दूर ठेवले आहे. मात्र, शोएब आणि तिचा घटस्फोट होऊन आता काही महिने झाले आहेत, हे सांगणे आज आवश्यक आहे. तिने शोएबला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. तिच्या आयुष्याच्या या संवेदनशील काळात, आम्ही सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनंती करू इच्छितो की कोणत्याही चुकीच्या बातम्या आणि चर्चा पसरवू नये. तिच्या ‘खाजगीपणाच्या अधिकाराचा’ सन्मान ठेवावा अशी विनंती आहे,” असेही आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे.

‘खुला’ प्रथा म्हणजे नेमके काय?

तलाक आणि खुला यात फारसा फरक नाही. ‘खुला’चा शाब्दिक अर्थ किंवा अरबी भाषेत “पूर्ववत करणे” असा अर्थ होतो. जेव्हा एखादी स्त्री निकाहचे बंधन स्वतः दूर करुन पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेते, तेव्हा त्याला ‘खुला’ म्हणतात. तर जेव्हा हा निर्णय पुरुषाच्या बाजूने होतो तेव्हा त्याला तलाक म्हणतात. खुलाची प्रथा वैवाहिक जीवनात नाखूष असलेल्या महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठित पद्धतीने वेगळे होण्याचा पर्याय देते. कुराण आणि हदीसमध्येही याचा उल्लेख आहे. शोएब आणि सानियाच्या नात्यात सानियाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे दोघे तलाकमधून नाही तर खुला प्रथेतून वेगळे झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube