यशस्वीचा वेस्ट इंडिजमध्ये पराक्रम ! पदार्पणात मोठी खेळी करत सुनील गावस्करांची बरोबरी

  • Written By: Published:
यशस्वीचा वेस्ट इंडिजमध्ये पराक्रम ! पदार्पणात मोठी खेळी करत सुनील गावस्करांची बरोबरी

WI vs IND 1st Test: वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी घरच्या मैदानावरच भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्कारली. त्याच मैदानावर पदार्पणात यशस्वी जैस्वालने शानदार खेळी करत अर्धशतक झळकाविले आहे. यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) व रोहित शर्मा (Rohit Sharma)या सलामीवीरांनी जोरदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी मजबूत स्थितीत गेला आहे. यशस्वीने पदार्पणात अर्धशतक झळकावून एक विक्रमही आपल्या नावावर नोंदविली आहे. 1971 नंतर भारताच्या सलामीवाराने वेस्ट इंडिजविरुध्द पर्दापणात अर्धशतक झळकविले आहे. (WI vs IND 1st Test match Yashasvi Jaiswal made fifty )


Faf Du Plessis Birthday: क्रिकेट विश्वाचा ‘राजा’ ज्याला क्रिकेट बोर्ड सक्तीने निवृत्त करतंय

तर रोहित शर्मा आणि यशस्वीने ही सलामीवीर जोडी वेस्ट इंडिजविरुध्द 17 वर्षांनंतर शतकी भागीदारी करणारी पहिली भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 2006 मध्ये वसीम जाफर व वीरेंद्र सेहवागने अशी कामगिरी केलेली आहे. तर वेस्ट इंडिजमध्ये कसोटीत पन्नासपेक्षा जास्त धावा करणाऱ्या जैस्वाल हा दुसरा भारती खेळाडू आहे. 1971 मध्ये सुनील गावस्कर यांनी दोन्ही डावांत अर्धशतके झळकविली होती. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत भारताने एकही गडी न गमावता 167 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यात जैस्वाल हा 78 धावांवर खेळत आहे. त्याने 190 चेंडूचा सामना करत नऊ चौकार मारले आहे. तर रोहित शर्मा हा 73 धावांवर खेळत आहे. शर्माने १७६ चेंडूचा सामना करत धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत सात चौकार आणि दोन षटकार खेचले आहेत.

पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा डाव 150 धावांत गारद केला होता. फिरकीपटू आर अश्विनने तब्बल पाच विकेट घेत वेस्ट इंडिजचे कंबरडे मोडले होते. यामुळे अश्विनच्या नावावर अनेक विक्रम नोंदविण्यात आले. त्यानंतर भारताच्या सलामीवीरांनी जोरदार सुरुवात केली. यशस्वीने आपल्या कसोटीतील पदार्पणात अर्धशतक झळकविले आहे.

यशस्वीने अर्धशतक झळकविल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड हे खूप खूश झाले होते. त्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत यशस्वीच्या खेळाचे कौतुक केले. विराट कोहलीने टाळ्या वाजवत जल्लोष केला आहे. गेल्या काही दिवसांपासून 21 वर्षीय जैस्वाल हा फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यशस्वी जैस्वालने 14 सामन्यांमध्ये सहाशेहून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची भारतीय संघात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी निवड झाली. त्याने शानदार अर्धशतक झळकवत आपली निवड योग्य असल्याचे पहिल्याच सामन्यात दाखवून दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube