भारतीय क्रिकेटच्या 5 खेळाडूंचं ‘बॅडलक’; नशीबानं साथ सोडली, अज्ञातवासातच संपलं करिअर
Indian Cricket : देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या पाच खेळाडूंनी रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) समारोपाबरोबरच निवृत्तीची घोषणा केली. या खेळाडूंमध्ये बंगालचा दिग्गज मनोज तिवारी, झारखंडचा फलंदाज सौरभ तिवारी, वेगवान गोलंदाज वरुण आरोन, मुंबईचा धवल कुलकर्णी आणि विदर्भाचा रणजी ट्रॉफी विजेता कर्णधार फैज फजल यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी आता निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता हे खेळाडू पुन्हा मैदानात दिसणार नाहीत. या खेळाडूंनी निवृत्तीची वेगवेगळी कारणे दिली आहेत. आता यापुढे हे खेळाडू काय करणार याचे उत्तर आज देता येणे शक्य नाही.
मनोज तिवारी
बंगालचा स्टार फलंदाज मनोज तिवारी (Manoj Tiwari) आता पुन्हा मैदानात दिसणार नाही. मनोज तिवारी राजकारणातही सक्रिय आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सरकारमध्ये मनोज तिवारी खेलमंत्री आहे. मनोज तिवारीने टीम इंडियासाठी (Team India) 12 एकदिवसीय आणि तीन टी 20 सामने खेळले आहेत. या सामन्यात 1 शतक आणि एक अर्ध शतकासह 287 धावा त्याच्या नावावर आहेत. याव्यतरिक्त मनोज तिवारीने 148 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 30 शतके आणि 45 अर्धशतकाच्या मदतीने 10 हजार 195 धावा केल्या आहेत.
SL vs AFG : श्रीलंकेचा पराक्रम! दुसरा सामना जिंकत मालिकाही खिशात; अफगाणिस्तानचा पराभव
फैज फजल
फजलाच्या कप्तानीत विदर्भाच्या संघाने 2017-18 मध्ये पाहिले रणजी विजेतेपद मिळविले होते. भारताकडून फक्त एकच वनडे सामना खेळण्याची संधी फैजला मिळाली. 2016 मधील झिम्बाब्वे दौऱ्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात त्याला संधी मिळाली. या सामन्यात फौजने शानदार अर्धशतक केले होते. यानंतर मात्र त्याला पुन्हा टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. 138 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात फैजने 24 शतके आणि 39 अर्धशतकाच्या मदतीने 9 हजार 184 धावा केल्या.
धवल कुलकर्णी
मुंबईचा धवल कुलकर्णी त्याच्या (Dhaval Kulkarni) स्विंग आणि अचूक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक विश्वासू गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. तब्बल 17 वर्षे त्याने देशांतर्गत क्रिकेटसाठी दिली. या काळात त्याने 95 सामने खेळले. यामध्ये त्याने 281 विकेट्स घेतल्या. 2014 मध्ये धवलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंविरुद्ध पदार्पण केले. तर झिम्बाब्वे विरुद्ध पहिला टी 20 सामना खेळला.
मनोज तिवारीची क्रिकेटमधून निवृत्ती, एका गोष्टीचं व्यक्त केलं दुःख
सौरभ तिवारी
आक्रमक फलंदाज सौरभ तिवारीने निवृत्ती (Saurabh Tiwari) जाहीर केल्याने झारखंड संघाला मोठा (Jharkhand) धक्का बसला आहे. सौरभ 17 वर्ष झारखंड संघासाठी खेळला. या काळात त्याने 115 प्रथम श्रेणी सामन्यात 8 हजार 30 धावा केल्या. यामध्ये 22 शतक आणि 34 अर्ध शतकांचा समावेश आहे. टी 20 क्रिकेट लीगमधील धडाकेबाज कामगिरी नंतर सौरभची टीम इंडियात निवड झाली. त्याने तीन वनडे सामन्यात 49 धावा केल्या. यानंतर मात्र त्याला पुन्हा कधीच संधी मिळाली नाही. जर तुम्हाला टी 20 लीग किंवा राष्ट्रीय संघात संधी मिळत नाही तेव्हा युवा खेळाडूंसाठी तुम्ही जागा करून देणे गरजेचे ठरते असे तो निवृत्ती घेताना म्हणाला होता.
वरुण अॅरोन
भारताचा वेगवान गोलंदाज वरुण अॅरोनला दुखापतींमुळे चांगली कामगिरी करता आली नाही. 66 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात त्याने 173 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियासाठी वरूनने नऊ वनडे आणि नऊ टी 20 सामने खेळले. या सामन्यात त्याने अनुक्रमे 18 आणि 11 विकेट्स घेतल्या. 2011 मध्ये पदार्पण करणाऱ्या वरुणने 2015 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. यानंतर त्याला पुन्हा संघात कमबॅक करता आले नाही.