Ranji Trophy 2023 : रणजी ट्रॉफीत विदर्भ संघाने रचला इतिहास! 73 धावांच्या लक्ष्याचा…

Ranji Trophy 2023 : रणजी ट्रॉफीत विदर्भ संघाने रचला इतिहास! 73 धावांच्या लक्ष्याचा…

Ranji Trophy 2023 Vidarbha Cricket Team : रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2023) विदर्भ संघाकडून नवा इतिहास रचण्यात आलाय. गुजरातविरुध्दच्या सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करीत विदर्भ संघाने एक नवा विक्रम केलाय. विदर्भ संघाने दिलेल्या 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग गुजरात संघ करु शकला नसून गुजरात संघ अवघ्या 54 धावांत सर्वबाद झाला. गुजरातला 17 धावांनी सामना गमवावा लागला आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोनूसार, भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बचावलेल्या सर्वात कमी धावसंख्येचा हा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम बिहारच्या नावावर होता. बिहारने 1948-49 मध्ये जमशेदपूर येथे दिल्लीविरुद्ध 78 धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव केला होता.

तसेच नागपूरच्या जामठा मैदानावर विदर्भ आणि गुजरात यांच्यात सामना रंगला. विदर्भाच्या विजयाचा हिरो ठरला तो डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य सरवटे, सरवटे याने दुसऱ्या डावात अवघ्या १७ धावांत सहा बळी घेतले. तर पहिल्या डावात पाच विकेट्सही घेतल्या होत्या.

त्याआधी बुधवारी गुजरातचा डावखुरा फिरकी गोलंदाज सिद्धार्थ देसाईने सहा बळी घेत विदर्भाला दुसऱ्या डावात अवघ्या २५४ धावांत रोखले. त्यावेळी गुजरात हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गुजरातची धावसंख्या एक विकेटवर सहा धावा होती.

शेवटचा सामना पंजाबशी
तिसऱ्या दिवशीच्या खेळात सरवटेने सामन्याचे चित्र फिरवल्याचं पाहायला मिळालंय. गुरुवारी सरवटेने आपले पराक्रम दाखवत गुजरातच्या फलंदाजीची फळी उद्ध्वस्त केली. डावखुरा फिरकी गोलंदाज हर्ष दुबेनेही 11 धावांत तीन बळी घेतले. 18 धावांवर धावबाद झालेला सिद्धार्थ गुजरातच्या दुसऱ्या डावात दुहेरी धावसंख्या गाठणारा एकमेव फलंदाज होता.

सामन्यादरम्यान 81 धावांत 11 बळी घेणाऱ्या सरवटेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या विजयानंतर विदर्भ त्यांच्या गटात पंजाबसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, मध्य प्रदेशला फॉलोऑन देणारा पंजाब आपला सामना संपल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. विदर्भाचा शेवटचा सामना पंजाबविरुद्धच आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube