यशस्वी जैस्वालला द्विशतकांचा डबल फायदा, कसोटी क्रमवारीत मोठी झेप; टॉप-5 मध्ये 3 भारतीय

यशस्वी जैस्वालला द्विशतकांचा डबल फायदा, कसोटी क्रमवारीत मोठी झेप; टॉप-5 मध्ये 3 भारतीय

ICC Rankings : यशस्वी जैस्वालने कसोटी क्रमवारीत (ICC Rankings) मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध सलग दोन द्विशतके झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) क्रमवारीत 14 स्थानांची प्रगती केली आहे. तो आता 15व्या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे. तीन भारतीय खेळाडूंनी वनडे क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. शुभमन गिल, विराट कोहली (Virat Kohali) आणि रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.

जाहीर झालेल्या कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत भारतीय फलंदाजांना फायदा झाला आहे. जैस्वालने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले होते. विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात जैस्वालने भारताच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना 209 धावा केल्या. यानंतर, राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने 214* धावा केल्या. याशिवाय जैस्वालने हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही 80 धावांची खेळी केली होती.

Prajakta Mali च्या ‘भिशी मित्र मंडळ’ च्या चित्रीकरणाला सुरुवात, प्रिया बेर्डे करणार कमबॅक

कसोटी क्रमवारीत टॉप-5 बद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन 893 रेटिंगसह अव्वल स्थानावर आहे. याशिवाय स्टीव्ह स्मिथ 818 रेटिंगसह दुसऱ्या, डॅरिल मिशेल 780 रेटिंगसह तिसऱ्या, बाबर आझम 768 रेटिंगसह चौथ्या आणि इंग्लंडचा जो रूट 766 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.

Pratija : दगडूला अखेर खऱ्या आयुष्यातील प्राजु भेटली; पाहा प्रथमेश-क्षितिजाचे प्री वेडिंग

वनडे क्रमवारीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व
एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर शुभमन गिल 801 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर, विराट कोहली 768 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आणि रोहित शर्मा 746 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 728 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे. तर एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. बाबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 824 रेटिंगसह अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.

Mithila Palkar : वेब क्विन मिथिला पालकरच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिलखेच अदा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube