Yashasvi Jaiswal ने रचला इतिहास, 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्ड मैदानांवर घडलं असं काही…

Yashasvi Jaiswal : अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफीचा (Anderson -Tendulkar Trophy) चौथा कसोटी समाना आजपासून मँचेस्टरमधील (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर (Old Trafford Ground) खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) इतिहास रचला आहे. भारताच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने शानदार फलंदाजी करत 58 धावांची दमदार खेळी केली आहे. त्याने के. एल राहुलसह (KL Rahul) पहिल्या विकेटसाठी 94 धावा जोडल्या. या दरम्यान जयस्वालने 10 चौकार आणि एक षटकार देखील मारला. या दमदार खेळीसह जयस्वालने इतिहास रचला आहे.
सुनील गावस्करनंतर (Sunil Gavaskar) या मैदानावर अर्धशतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल पहिला भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे. सुनील गावस्कराने 1974 मध्ये या मैदानावर भारताकडून सलामीवीर म्हणून अर्धशतक झळकावले होते. पहिल्या डावात खेळताना जयस्वालने 107 चेंडूंचा सामना करत 58 धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 10 चौकार आणि एक षटकार मारला.
🚨 HISTORY FOR JAISWAL 🚨
– Yashasvi Jaiswal becomes the first Indian opener to score fifty at Old Trafford in the last 50 years in Test Cricket History. 🤯 pic.twitter.com/7uMxshvIb0
— Tanuj (@ImTanujSingh) July 23, 2025
एक हजार धावाही पूर्ण
जयस्वालने या खेळीदरम्यान इंग्लंडविरुद्ध कसोटीत एक हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. तो इंग्लंड संघाविरुद्ध एक हजार धावा करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत कसोटीत इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 16 डावांमध्ये 66 च्या सरासरीने 1003 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने तीन शतके आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. यशस्वीने दोन द्विशतकेही झळकावली आहेत.
प्लेइंग 11 मध्ये 3 बदल
तर दुसरीकडे चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग 11 मध्ये तीन बदल केले आहे. भारताने या सामन्यासाठी करुण नायरच्या जागी साई सुदर्शनला संधी दिली आहे. तर आकाशदीपच्या जागी अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी मिळाली आहे. याचबरोबर नितीशकुमार रेड्डीच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.