धक्कादायक, सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याने जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदारानं आयुष्य संपवलं

Government Contractor Suicide : राज्य सरकारकडून वेळेत बिल मिळत नसल्याने सांगली (Sangli) जिल्ह्यात जलजीवन मिशनचे (Jal Jeevan Mission) काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदराने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हर्षल पाटील (Harshal Patil) असं या सरकारी कंत्राटदराचे नाव आहे. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावत घडली आहे. राज्य सरकारकडून केलेल्या कामाचा मोबदला वेळेत न मिळाल्याने हर्षलने आत्महत्या (Government Contractor Suicide) केली असल्याचा आरोप सरकारी कंत्राटदारांच्या संघटनेकडून करण्यात आला आहे. हर्षलच्या पाठीमागे पत्नी, एक पाच वर्षांची मुलगी, दोन लहान भाऊ व आई वडील असा परिवार आहे .
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, हर्षल पाटील यांनी स्वत; च्या शेतात गळाफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे शासनाकडे जवळपास 1.40 कोटींचे देयके प्रलंबित आहेत. तसेच सावकार आणि इतर लोकांकडून त्याने जवळपास 65 लाखांचे कर्ज घेतले होते. हर्षल गेल्या अनेक दिवसांपासून मित्रांना मी आत्महत्या करतो हे शासन पैसे देत नाही इतर लोक मला पैशासाठी तगादा लावत आहेत. वडिलांना काय सांगू ? असं हर्षल मित्रांना सांगत होता.
Renault Triber Facelift 7 सीटर फक्त 6.30 लाखात लॉन्च; एर्टिगाला देणार टक्कर, जाणून घ्या सर्वकाही
… तर कंत्राटदार जीवन संपवून टाकती
तर दुसरीकडे हर्षलच्या कुटुबांस राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी आणि प्रलंबित देयके देऊन सदर त्यांच्या नावे असलेले कंत्राटदार म्हणून असलेले शासकीय नोंदणीकरण त्यांच्या सुविधा पत्नीच्या नावे वर्ग करावे. शासनाने कंत्राटदारांची सर्व विभागाकडील देयके तातडीने देण्याची व्यवस्था करावी अन्यथा वयुवक,उद्योजक, कंत्राटदार आपले जीवन संपवून टाकती आणि याची मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल. असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणीपुरवठा संघटना राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले यांनी सरकारला दिला आहे.