सॉरी, आई… चिठ्ठीत शिक्षिकांची नावं लिहित सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत जीवन संपवलं…
Sangli student ने दिल्लीमध्ये शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Sangli student ends life in Delhi after writing teachers’ names in note : सांगलीच्या दहावीच्या विद्यार्थ्याने दिल्लीमध्ये शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणानंतर पालकांनी आक्रमक पवित्र घेतला असून त्यानंतर आता आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चार शिक्षिकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सांगलीतील शौर्य प्रदीप पाटील हा दहावीचा विद्यार्थी हा दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेमध्ये शिक्षण घेत होता. त्याने मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वरून उडी मारून आत्महत्या केली आहे.आज सांगलीतील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर व त्याच्या मूळ गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मात्र त्या अगोदर त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
ज्यामध्ये त्यांनी शाळेतील प्राचार्या आणि शिक्षिकांकडून त्याचा छळ केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.विद्यार्थ्याचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून सोने चांदी गलाई व्यवसायानिमित्त दिलीच स्थायिक असल्याने शौर्य प्रदीप पाटील हा दहावीचा विद्यार्थी हा दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेमध्ये शिक्षण घेत होता.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
या सुसाईड नोटमध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलं आहे की, मेरा नाम…. है, … इस मोबाईल नंबर पर कॉल कर देना प्लीज, आय अॅम व्हेरी सॉरी.टीचरने इतना बोला की मुझे ये करना पडा. यदि किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पेरेंट्सने बहुत कुछ किया. आय अॅम सॉरी मे उनको कुछ नही दे पाया. सॉरी भैया, सॉरी मम्मी आपका आखरी बार दिल तोड रहा हू. स्कूल की टीचर हेही ऐसी क्या बोलू…
