आमच्या शूर सैनिकांनी करून दाखवलं; लाल किल्ल्याजवळील स्फोटाबाबत POK च्या माजी पंतप्रधानांचा धक्कादायक दावा
blast near Red Fort बाबत पाक व्यक्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अनवारूल हक यांनी पाकिस्तानी नेत्याने धक्कादायक दावा केला आहे.
Former POK PM’s shocking claim about the blast near Red Fort :दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारच्या स्फोटाबाबत पाकिस्तानी नेत्याने धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, हा हल्ला पाकिस्तानच्या समर्थनातूनच झाला आहे. हे वक्तव्य पीओके म्हणजे पाक व्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अनवारूल हक यांनी केलं आहे.
काय म्हणाले चौधरी अनवारूल हक?
त्यांनी विधानसभेमध्ये म्हटलं की, मी पहिलेच म्हटलं होतं की, भारताने बलुचिस्तानला रक्तरंजित केलं. तर आम्ही लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत तुमच्यावर हल्ले करू. अल्लाची मेहेरबानी आहे की, आम्ही हे करून दाखवलं आमच्या शूर सैनिकांनी हे करून दाखवलं.
धक्कादायक! पुण्यातील डेक्कनमध्ये रेस्टॉरंट आणि बारवर कोयत्याचा धाक दाखवत मध्यरात्री दरोडा
दरम्यान पाकिस्तानकडून पहिल्यापासूनच भारतावर बलुचिस्तानमध्ये अशांतता निर्माण करण्याचा खोटा आरोप करण्यात आलेला आहे. यावर भारताने पाकिस्तान ही चाल सीमेवरील दहशतवादी हल्ल्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी करत असल्याचे म्हटले आहे. भारताने नेहमी बलुचिस्तानमधील हिंसेवर कोणतीही भूमिका घेतलेली नाही.
नाराज शिंदेंनी शाहंसमोर वाचला फडणवीस अन् चव्हाणांच्या तक्रारीचा पाढा? म्हणाले, मी रडणारा नाही…
दरम्यान भारतीय गुप्तचर संघटनांनी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामध्ये मागे दहशतवादी संघटना जैश-ए- मोहम्मदचा हात असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्याचा सध्या तपास सुरू असून या प्रकरणात एनआयएला (NIA) मोठी कारवाई करण्यात यश आलं आहे. या आत्मघातकी बॉम्बस्फोटाचा दहशतवादी कट रचणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मेष ते मीन, कसं आहे आजचं बाराही राशींचं राशिभविष्य जाणून घ्या सविस्तर…
आमिर रशीद अली असं अटक करण्यात आलेला आरोपीचच नाव आहे. स्फोटात वापरलेली कार त्याच्या नावावर नोंदणीकृत होती. एनआयएने त्याला दिल्लीत अटक केली. सुरुवातीला दिल्ली पोलीस स्फोटाचा तपास करत होते. परंतु, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. एनआयएने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली, ज्यामध्ये आमिरला अटक करण्यात आली.
