मेष ते मीन, कसं आहे आजचं बाराही राशींचं राशिभविष्य जाणून घ्या सविस्तर…
Aries to Pisces आज 20 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व ग्रहमानाचा परिणाम बाराही राशींवर कसा होणार जाणून घेऊ सविस्तर…
Aries to Pisces, know today’s horoscope for all twelve zodiac signs in detail : आज 20 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रहांची स्थिती ही अशी आहे. की गुरु कर्क राशिमध्ये केतू सिंह राशिमध्ये चंद्र कन्या राशिमध्ये सूर्य आणि शुक्र तूळ राशीमध्ये बुध आणि मंगळ वृश्चिक राशीमध्ये राहू कुंभ राशीमध्ये आणि शनी मीन राशीमध्ये स्थित आहे या सर्व ग्रहमानाचा परिणाम बाराही राशींवर कसा होणार जाणून घेऊ सविस्तर…
मेष – या राशीच्या व्यक्तींसाठी आजच्या दिवशी त्यांच्या शत्रूवर त्यांचा दबदबा कायम राहील. मुलांच्या आरोग्यावर लक्ष द्या प्रेम आणि संततीची स्थिती ठीकठाक असेल .आरोग्य मध्यम स्वरूपाचे राहून व्यापार उत्तम राहील.
वृषभ – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अभ्यास आणि करिअरच्या दृष्टीने एक संधी देणार आहे. मात्र भावूक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. आरोग्य जेमतेम असेल प्रेम आणि संततीची स्थिती मध्यम राहून व्यापार चांगला राहील.
मिथुन – या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी काही गृहकलह होण्याचे संकेत आहेत. मात्र जमीन घर वाहन यांच्या खरेदीचे प्रबळ योग संभवतात .आरोग्य चांगलं राहून प्रेम आणि संततीची स्थिती देखील चांगली राहणार आहे.
कर्क – या राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस त्यांच्या पराक्रमांचा चांगलं फळ देणार आहे. व्यवसायामध्ये यश मिळून आप्तांची साथ मिळेल. आरोग्य समस्या सुटतील प्रेमाने संततीची स्थिती चांगली राहील.
सिंह – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस धनलाभाचा आहे. कुटुंबामध्ये वाढ होऊन आरोग्याच्या समस्या मात्र डोकवर काढू शकतात. प्रेमाने संपत्तीची स्थिती उत्तम राहील.
कन्या – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक ऊर्जा निर्माण करणार आहे. आरोग्य चांगलं राहून प्रेम आणि संततीची स्थिती उत्तम राहील व्यापारही चांगला असणार आहे.
तूळ – या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा अस्वस्थता निर्माण करणार आहे. खर्च वाढते डोकेदुखी डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. प्रेम आणि संततीची स्थिती मध्यम राहून व्यापार मात्र चांगला असेल.
वृश्चिक – या राशीच्या लोकांसाठी नवीन उत्पन्नाची साधने निर्माण होतील. तसेच जुन्या साधनांमधून देखील पैसे येते आरोग्य उत्तम राहील. प्रेम आणि संततीची स्थिती ही चांगली राहून व्यापारातही भरभराट होईल.
धनु – या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी कोर्टकचेरीचे प्रकरणांमध्ये विजय मिळणार आहे. व्यवसायामध्येही यश मिळवून वडिलांची साथ लाभेल. आरोग्य मध्यम स्वरूपाचा असून प्रेम आणि संततीची स्थिती मात्र चांगली असेल.
मकर – या राशीच्या व्यक्तींना आज त्यांचा भाग्य साथ देईल. कामाच्या ठिकाणी तसेच करिअरमध्ये प्रगती होईल. आजच्या दिवशी आरोग्य पहिल्यापेक्षा उत्तम राहून प्रेम आणि संततीची स्थिती चांगली असेल.
कुंभ – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा प्रतिकुल असेल. दुखापतीची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या समस्येमध्ये सापडू शकता. त्यामुळे आरोग्यावर लक्ष द्या. प्रेम संतती यांची स्थिती ठीक राहून व्यापारामध्येही उत्तम परिस्थिती असेल.
मीन – या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी त्यांच्या जोडीदाराच्या भक्कम साथ मिळेल नोकरीमध्ये चांगली स्थिती राहून आरोग्यामध्ये सुधारणा होईल प्रेम आणि संततीची साथ मिळेल व्यापारामध्ये वृद्धी होईल.
