विधानसभेपूर्वी अजित पवारांना पुन्हा धक्का, आमदार दीपक चव्हाण शरद पवारांच्या पक्षात

  • Written By: Published:
विधानसभेपूर्वी अजित पवारांना पुन्हा धक्का, आमदार दीपक चव्हाण शरद पवारांच्या पक्षात

MLA Deepak Chavan : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शरद पवार यांनी मोठा धक्का दिला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू समर्थक संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjivraje Naik Nimbalkar) आणि आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहे.

यावेळी आमदार चव्हाण म्हणाले की, 1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून मी पक्षात काम करत आहे. 2009 मध्ये मला विधानसभेची संधी पक्षाने दिली होती. 2009  पासून आजपर्यंत 3 टर्म मी फलटण तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहे. सुरुवातीपासूनच मी शरद पवार यांच्यासोबत काम करत आहे आणि जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा आमच्या सर्वांसमोर धर्मसंकट उभं राहिले. शरद पवारांबाबत जेवढा आदर तेवढाच अजितदादांचा आहे. आपल्या घरातच फूट पडल्यामुळे निर्णय काय घ्यायचा हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला होता.

महाविकास आघाडीमध्ये आम्ही अडीच वर्ष सत्तेत होते मात्र जेव्हा सत्ता पडली तेव्हा आमची जी कामे होती, त्याला तात्काळ स्थगिती देण्यात आली होती आणि त्यामुळे वर्षभर कामे खोळंबली, लोकांच्या मागण्या, तालुक्याचा विकास पुढे करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वात आम्ही महायुतीत सहभागी झालो असं यावेळी आमदार चव्हाण म्हणाले.

महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो प्रत्येक आघाडीमध्ये स्थानिक मतभेद असतात मात्र ज्याप्रकारे इथले भाजपाचे स्थानिक नेतृत्व आणि आमच्यात मतभेद आहेत, हे वाद स्थानिक पातळीवर असायला हरकत नाही असं देखील ते म्हणाले. तसेच भाजपच्या राजातल्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या लोकांना नको तेवढी ताकद मिळत आहे असा आरोप देखील त्यांनी केला.

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपये कामाचा भव्य शुभारंभ

तसेच या ताकदीचा उपयोग हे लोक आमच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी करत आहे आणि त्यामुळे आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला होता आणि त्यामुळे आम्ही राजीनामा ईमेल केला आणि उद्या प्रत्यक्षात राजीनामा देणार अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube