Badlapur : …तर घटनाच घडली नसती, दीपक केसरकरांनी दोन सेविकांची चूक दाखवून दिली

Badlapur : …तर घटनाच घडली नसती, दीपक केसरकरांनी दोन सेविकांची चूक दाखवून दिली

Badlapur : बदलापूर अत्याचार घटनाप्रकरणात (Badlapur Rape Case) नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या घटनेनंतर आरोपीसह इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून घटनेच्या दिवशी शाळेतील दोन सेविक कर्तव्यावर हजर नव्हत्या, सेविका हजर असत्या तर हा प्रकार घडलाच नसता, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी दिलीयं. या प्रकरणी दोन सेविकांनाही सहआरोपी करण्यात यावं, अशी शिफारस करण्यात आली असल्याचंही केसरकरांनी यावेळी स्पष्ट केलंय.

Sindhudurga : छ. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला; PM मोदींच्या हस्ते वर्षभरापूर्वीच झालेले अनावरण

दीपक केसरकर म्हणाले, अत्याचाराच्या घटनेत सर्वात मोठी चूक ही दोन सेविकांची आहे. शाळेतील सेविका कामिनी काळेकर आणि निर्मला भुरे यांच्यावर मुलींना शौचालयात नेण्याची व आणण्याची जबाबदारी होती. घटनेच्या दिवशी या दोन्ही सेविका कर्तव्यावर हजर नसल्यामुळेच हा प्रकार घडला आहे. शिक्षण विभागाकडून दोन्ही सेविकांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आल्याचं केसरकरांनी सांगितलंय.

तसेच या घटनेत कोणाला सहआरोपी करायचं याबाबतचा निर्णय गृह विभाग घेणार असून कोणालाही आरोपी करण्यापूर्वी त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. शाळेतील शिक्षिका, मुख्याध्यापिका, सेविका व संस्थेतील पदाधिकारी यामध्ये दोषी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी असं अहवालात नमूद करण्यात आलं असल्याचं केसरकर म्हणाले आहेत.

दरम्यान, ही घटना १३ ऑगस्ट रोजी घडली होती. १४ ऑगस्ट रोजी मुलीच्या आजी-आजोबांनी वर्गशिक्षिका दिपाली देशपांडे यांच्याकडे तक्रार केली. मात्र, वर्गशिक्षिकेने याबाबत पोलिसांना कळवलं नाही. तसेच १४ ऑगस्ट रोजी मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली. मात्र त्यांनी देखील याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावरही पॉक्सोच्या कलम १९ (२) व २१ (१) अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस आम्ही केली असल्याचं केसरकरांनी स्पष्ट केलंय.

नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांचं निधन; हैदराबाद येथे सुरू होते उपचार

नेमकं काय घडलं?
बदलापुरमधील एका नामंकित शाळेत 13ऑगस्ट रोजी दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई केली असल्याचा दावा कुटुंबियांकडून करण्यात आला. या प्रकारानंतर संपप्त बदलापुरकरांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर तब्बल 11 चक्काजाम आंदोलन करुन आरोपीला आजच फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. त्यानंतर राज्य सरकारकडून ठोस पाऊल उचलून घटनेची दखल घेण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube