अनिरुद्धाज अ‍ॅकॅडमीच्या स्वयंसेवकांकडून 2.24 लाख सिडबॉल्सचे रोपण; मातृभूमीसाठीचं हरित व्रत..

अनिरुद्ध अ‍ॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट (AADM) च्या 586 आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांनी 2.24 लाख सिडबॉल्सचे रोपण केले.

Seed Ball Plantation

Mumbai News  : सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने अनिरुद्धाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट (AADM) च्या 586 आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांनी शहापूर (नाडगाव), बदलापूर आणि पनवेल (अडई गाव) परिसरातील जंगलांमध्ये 2,24,789 सिडबॉल्सचे रोपण केले. या सिडबॉल्समध्ये आंबा, जांभूळ, चिंच, काजू, बांबू, लिंबू, कदंब, फणस अशा 21 स्थानिक प्रजातींचा समावेश होता.

हा केवळ उपक्रम पर्यावरणपूरक आहेच शिवाय मातृभूमीसाठी एक भावनिक आणि आध्यात्मिक अर्पणही आहे. “ही एक हरित भविष्याकडे वाटचाल आहे. श्रद्धा, सेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम.” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. याबाबत अधिक माहितीसाठी www.aniruddhasadm.com या वेबसाइट आणि @aniruddhasadm सोशल मीडिया अकाउंटला भेट देऊ शकता.

पनवेल महानगरपालिकेत भरती, ‘या’ पदांसाठी थेट मुलाखतीतून निवड

follow us