अजितदादांचा खांदा, भाजपवर निशाणा; मोरारजी देसाईंचा संदर्भ देत पवारांनी सांगितली कार्यक्षमता

  • Written By: Published:
अजितदादांचा खांदा, भाजपवर निशाणा; मोरारजी देसाईंचा संदर्भ देत पवारांनी सांगितली कार्यक्षमता

Sharad Pawar Press Conference : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्यात शाब्दीक वाद मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. बंडखोरीनंतर ज्या ज्यावेळी अजितदादांनी भाषण केले. त्या-त्या वेळी अजित पवारांनी पवारांच्या वयाचा उल्लेख करत त्यांना आता तरी थांबले पाहिजे असा सल्ला दिला आहे. अजितदादांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या वयावर अखेर पवारांनी मोरारजी देसाईंचा संदर्भ देत या टीकेमागे भाजप असल्याची अप्रत्यक्ष टीका भाजपवर करत समाचार घेतला आहे. माझ्या क्षमतेबाबत विरोधकांनीदेखील कधी आक्षेप घेतला नसल्याचे पवारांनी सांगितले. खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही, असे पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का; वायकरांनंतर विचारे IT च्या रडारवर, राजकीय वातावर तापलं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सातत्याने पवारांच्या वयावरून टीका केली जात आहे. वय झालं तरी ते निवृत्त होत नाहीत. कधी निवृत्त होणार? घरी बसून मार्गदर्शन करावं, असं विधान अजित पवार यांनी केलं होतं बंडखोनंतरच्या पहिल्या भाषणात केलं होतं. त्यानंतर आज (दि.9) पवारांनी भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाईंचा संदर्भ देत भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. अजित पवारांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी बोलू इच्छित नाही.

Shirur Loksabha Seat : पार्थ पवार आज दिवसभर हडपसरमध्ये : शिरूरचं जवळपास ठरलंय!

माझ्या कार्यक्षमतेवर विरोधकांनीही आक्षेप घेतला नाही 

1967 ला मी संसदीय राजकारणात आलो. माझ्या क्षमतेबद्दल विरोधकांनीदेखील कधी आक्षेप घेतला नाही. मोरारजी देसाई उपपंतप्रधान झाले तेव्हा ते 83 वर्षांचे होते. मोरारजी देसाईंचे उदाहरण देत वयाबाबत बोलणाऱ्या अजित पवारांच्या वक्तव्यामागे भाजपचं असल्याचा रोख पवारांनी देसाईंचा संदर्भ असल्याचे अधोरेखित केले आहे. अनेक नेते वय वाढलं तरी सक्रिय होते.

अजित पवारांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेबद्दलचा असेल तर, अनेक लोकांची उदाहरणं देता येतील. वयाच्या 83 व्या वर्षी मोरारजी देसाई पंतप्रधान होते. मोरारजी देसाई हे सुद्धा ज्येष्ठ होते त्यांचं पण वय होतं पण ते काम करत होते. त्यांच्या मागे जनतेचें बहुमत होतं. त्यामुळे अशा वय वगैरे काढण्याच्या गोष्टी काढू नये असे मला स्वतःला वाटत नसल्याचे पवार म्हणाले.

Sharad Pawar : आव्हाडांना दिल्लीत धाडणार; मविआच्या बैठकीचा पवारांनी सांगितला प्लॅन

वयावरून तुम्हाला मिळणाऱ्या सहानभुतीमुळे अजितदादांकडून अशा प्रकारची टीका केली जात आहे का? असे विचारले असता मी काही याबाबत अधिक खोलात जाऊ इच्छित नसल्याचे पवार म्हणाले. माझ्या वयावर बोलावं हे योग्य वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न असल्याचेही पवारांनी यावेळी उत्तर दिले.

तोपर्यंत काम करत राहणार 

जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे, तोपर्यंत जनतेची सेवा करणं आणि सहकाऱ्यांना मदत करणं हे माझं काम आहे. त्यामुळे ते मी काम करत राहील. मी निवडणूक लढणार नाही हे मी जाहीरपणे सांगितलं आहे. राज्यसभेचे माझे एक-दोनच वर्ष राहिली आहेत. ते अर्धवट सोडू का? असा सवाल करत मला माझ्या पक्षाने राज्यसभेत पाठवलं. ते अर्धवट सोडून कसं थांबू? मला लोकांना संसदेत पाठवलं आहे. त्यामुळे कार्यकाळ असेपर्यंत काम करत राहणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube