लोकसभा अध्यक्ष कोण होणार? भाजपचे वाढले टेन्शन; टीडीपीने घेतली वेगळी भूमिका

लोकसभा अध्यक्ष कोण होणार? भाजपचे वाढले टेन्शन; टीडीपीने घेतली वेगळी भूमिका

Lok Sabha Speaker Election 2024 : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली असून त्यांच्या मंत्रिमंडळाची (Modi Cabinet) घोषणा देखील करण्यात आली आहे. तर आता 18 व्या लोकसभेचा पहिला अधिवेशन 24 जूनपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याच कारण म्हणजे या अधिवेशात लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.

माहितीनुसार, 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड (Lok Sabha Speaker Election 2024) करण्यात येणार आहे. मात्र यावेळी भाजपकडे पूर्ण बहुमत नसल्याने लोकसभा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे एनडीएमध्ये किंग मेकरची भूमिका असणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जेडीयू (JDU) आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या टीडीपीची (TDP) या मुद्यावर वेगवेगळी भूमिका असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

या मुद्यावर भाजप जो निर्णय घेणार याला आमचा पाठिंबा असणार असल्याची भूमिका जेडीयूने घेतली आहे तर एनडीएच्या सर्व पक्षांनी लोकसभा अध्यक्ष पदासाठी एकमताने उमेदवार ठरवावा अशी भूमिका टीडीपीने घेतली आहे.

या प्रकरणात जेडीयू नेते केसी त्यागी म्हणाले, जेडीयू आणि टीडीपी एनडीएचे सहयोगी आहेत आणि लोकसभा अध्यक्ष पदावर भारतीय जनता पक्ष जो निर्णय घेईल त्याला आम्ही आमचा पाठिंबा देणार. तर दुसरीकडे टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते पट्टाभी रामा कोमारेड्डी म्हणाले, लोकसभा अध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार असणार याचा निर्णय एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र बसून घ्यावा. जेव्हा सर्व घटक पक्ष एकमताने उमेदवार ठरवणार त्या उमेदवाराला टीडीपीसह सर्व मित्र पक्ष पाठिंबा देणार असं टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते पट्टाभी रामा कोमारेड्डी म्हणाले.

तर राजस्थानचे माजी मुख्यंमत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी देखील या प्रकरणात भाष्य करत भाजपने लोकसभा अध्यक्षपद घेतला तर ते भविष्यात जेडीयू आणि टीडीपीच्या खासदारांची घोडदौड सुरू करेल. यामुळे टीडीपी किंवा जेडीयूला अध्यक्ष पद मिळाला पाहिजे.

धक्कादायक! मित्रच बनला वैरी… डोक्यात गोळी घालून केली हत्या

लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा मिळालेल्या आहे. त्यामध्ये भाजपला 240 तर टीडीपीला 16 आणि जेडीयूला 12 आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 07 जागा मिळालेल्या आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज