इंडिया आघाडीने टाकला होता मोठा डाव… नितीश कुमारांना दिली पंतप्रधानपदाची ऑफर

इंडिया आघाडीने टाकला होता मोठा डाव… नितीश कुमारांना दिली पंतप्रधानपदाची ऑफर

Nitish Kumar : लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा दणका बसला. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या मोठ्या राज्यांत भाजपाच्या जागा कमी झाल्या. चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपला साधं बहुमतही मिळालं नाही. त्यामुळे भाजपला आता तेलुगू देसम पार्टी आणि जेडीयूचा टेकू घ्यावा लागत आहे. या दोन्ही पक्षांनी एनडीए सरकारला समर्थन तर दिलं आहे पण, सोबतच दबावाचं राजकारणही सुरू केलं आहे. जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी त्यागी यांनी आता जो दावा केला आहे त्यामुळे एनडीत खळबळ उडाली आहे. इंडिया आघाडीने नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा दावा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

सत्तास्थापनेचं ठरलं! नितीश कुमारांच्या पक्षाला किती मंत्रीपदं? वाचा काय आहे गणित

नितीश कुमार यांनी मात्र एनडीए सोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ईव्हीएमवर कायमच टीका करणाऱ्या विरोधकांनाही स्पष्ट शब्दांत संदेश दिला आहे. जेडीयू आणि टीडीपीने एनडीएच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या आहेत. आम्ही आगामी पाच वर्षांसाठी पीएम मोदींच्या नेतृत्वाला पाठिंबा दिल्याचे त्यागी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार प्रकाश झोतात आले आहेत. त्यांच्या पक्षांनी एनडीए सरकारला पाठिंबा दिला असला तरी त्यांच्या बाबतच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीत. इंडिया आघाडीकडूनही त्यांना ऑफर दिल्या जात आहेत. मात्र जेडीयूने एनडीए सरकारला पाठिंबा दिला असून पाठिंब्याचे पत्रही सोपवले आहे. अशा परिस्थितीत एनडीए सरकारचा धोका काही प्रमाणात टळल्याचे सांगितले जात आहे.

Chandrababu Naidu : माजी मुख्यमंत्र्यांकडे 810 कोटींची संपत्ती, गेल्या पाच वर्षात 41 टक्क्यांनी वाढ

दरम्यान, भाजपने जरी 400 पार’ची घोषणा केलेली असताना या निवडणुकीत अवघ्या 240 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पक्षाला यंदा तब्बल 63 जागांचा फटका बसला आहे. त्यामुळे एनडीएमध्ये भाजपाची मोठी पीछेहाट झालेली असताना चंद्राबाबू नायडूंचा तेलगु देसम पक्ष आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तेलगु देसम पक्षाचे 16 खासदार निवडून आले आहेत. आघाडीत तिसऱ्या क्रमांकावर नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं 12 खासदारांसह आपलं महत्त्व अधोरेखित केलं आहे. त्यामुळे आता मंत्रिपदांच्या वाटपात इतर मित्रपक्षांना भाजपा किती आणि कोणती खाती देणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती असताना या दोन्ही पक्षांनी त्यांना हव्या असणाऱ्या मंत्रिपदांची यादी भाजपला दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज