‘ते दिलेला शब्द मोडतील आणि तुमचे पक्षही फोडतील’; आदित्य ठाकरेंचा जेडीयू-टीडीपीला इशारा
Aditya Thackeray : निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या (BJP) नेतृत्वातील एनडीए (NDA) आघाडीने सरकार स्थापनेचा दावा केला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) निवासस्थानी एनडीएची बैठक झाली. या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता ठाकरे गटाचे आमदार आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) टीडीपी (TDP) आणि जेडीयूला लोकसभा अध्यक्षपद आपल्याकडे घेण्याचं आव्हानं केलं.
Zhad Trailer: वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष उलगडणार ‘झाड’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 60 हून अधिक जागा कमी झाल्या. त्यामुळं सत्तास्थापनेसाठी भाजपला जेडीयू आणि टीडीपी या मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. या पक्षांनी मोदींना समर्थन दिलं. त्यामुळं भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार पुन्हा एकदा देशात सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झालं. दरम्यान, आता आदित्य ठाकरेंनी एक्सवर एक पोस्ट लिहित म्हटलं की, भाजपला पाठिंबा देऊ इच्छिणाऱ्या संभाव्य मित्रपक्षांना माझी नम्र विनंती आहे. लोकसभेचं अध्यक्षपद तुमच्याकडे घ्या. कारण भाजपच्या डावपेचांचा आम्हाला अनुभव आहे. ज्या क्षणी ते तुमच्या मदतीने सरकार बनवतील, तेव्हाच ते तुम्हाला दिलेला शब्द मोडतील आणि तुमचा पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला.
मोदी तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ, राष्ट्रपतींकडे सुपूर्द केले समर्थक खासदारांचे पत्र
मोदी कधी शपथ घेणार?
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची तारीखही निश्चित करण्यात आली असून मोदी 9 जून रोजी संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.
नायडू – नितीश कुमारांनी कोणती मिळणार?
तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी आयटी, दूरसंचार, ग्रामीण विकास आणि जलशक्ती या मलाईदार खात्यांची मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचाही मागणी केली. तर नितीश कुमार यांनी रेल्वे, कृषी आणि अर्थ राज्यमंत्री अशी मंत्रीपदे मागितली आहेत.