Chandrababu Naidu : माजी मुख्यमंत्र्यांकडे 810 कोटींची संपत्ती, गेल्या पाच वर्षात 41 टक्क्यांनी वाढ

Chandrababu Naidu : माजी मुख्यमंत्र्यांकडे 810 कोटींची संपत्ती, गेल्या पाच वर्षात 41 टक्क्यांनी वाढ

Chandrababu Naidu : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आज लोकसभा निवडणुकीसाठी  पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. तर आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठी ( Andhra Pradesh Assembly Elections) देखील मतदान होणार आहे.

माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या पत्नी एन भुवनेश्वरी (N Bhuvaneshwari) देखील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. 13 मे रोजी होणाऱ्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज (शुक्रवारी) कुप्पममध्ये एन भुवनेश्वरी यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्जासह प्रतिज्ञापत्र देखील सादर केले आहे.

या प्रतिज्ञापत्रानुसार, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती गेल्या पाच वर्षांत 41 टक्क्यांनी वाढली आहे. आता त्यांच्याकडे एकूण 810.42 कोटी रुपये संपत्ती आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या मालमत्तेतील सर्वात मोठा हिस्सा त्यांची पत्नी भुवनेश्वरी यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे हेरिटेज फूड्स लिमिटेडचे ​​(Heritage Foods Limited) 2.26 कोटी रुपयांचे शेअर्स आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत TDP प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, नायडू कुटुंबाच्या जंगम मालमत्तेचे मूल्य 574.3 कोटी रुपये होते. भुवनेश्वरीकडे 3.4 किलो सोने आणि 41.5 किलो चांदी आहे. तर नायडू यांच्याकडे वैयक्तिकरित्या 4.80 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि 36.31 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

चारशे सोडा हे दोनशेही पार करणार नाही… रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

तर त्यांच्या कुटुंबावर एकूण 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त दायित्वे आहेत. माजी मुख्यमंत्र्यांकडे 2.25 लाख रुपयांची ॲम्बेसेडर कारही आहे. तर प्रतिज्ञापत्रानुसार 24 एफआयआरमध्ये नायडू यांचे नाव आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज