चारशे सोडा हे दोनशेही पार करणार नाही… रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

चारशे सोडा हे दोनशेही पार करणार नाही… रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

Rohit Pawar On BJP : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी भाजपकडून (BJP) चारशे पारचा नारा दिला जात आहे. मात्र चारशे पार तर सोडा हे साधे दोनशे पार देखील करू शकणार नाही अशी टीका आज कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर केली आहे.

रोहित पवार आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा (Swabhimani Jansamvad Yatra) समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका करत लोकसभा निवडणुकीत भाजप दोनशे जागांवर देखील विजय होणार नसल्याचं म्हटले आहे. तर 200 ते 250 खासदार हे इंडिया आघाडीचे निवडून येणार आहे असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला.

अहमदनगर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा समारोप आज होता. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शरद पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अभिषेक कळमकर यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंचावरून भाषण करताना रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला, लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजपकडून देशभरात चारशे पारचा नारा दिला जातो आहे. रोहित पवार म्हणाले भाजपाला चारशे पार तर सोडा दोनशे ही जागा मिळणार नाही.

नागपूरला सर्वात कमी मतदान, फटका कुणाला? टफ फाइट असलेल्या चंद्रपुरात किती टक्के मतदान ?

इंडिया आघाडीसाठी देशभरात अनुकूल वातावरण असून 200 ते 250 खासदार हे निवडून येणार आहे असा विश्वास देखील यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज