काँग्रेस रोजच कमजोर होत आहे; 2029 मध्ये सगळ्यात छोटी पार्टी होईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात

Chandrashekhar Bawankule On Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाला जाहीर होत एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येणार हे

  • Written By: Published:
Chandrashekhar Bawankule On Bihar Election Result 2025

Chandrashekhar Bawankule On Bihar Election Result 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाला जाहीर होत एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष फेल ठरल्याने आता काँग्रेसवर जोरदार टीका होताना दिसत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत जवळपास 70 जागांवर निवडणूक लढवली होती मात्र सध्या समोर आलेल्या कलानुसार काँग्रेस पक्ष फक्त 5 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे आता काँग्रेस दररोजच कमजोर होत चालली असल्याची टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, बिहारच्या जनतेचा मी आभार मानतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या संकल्पावर भारतीय जनतेने शिक्कामोर्तब केल आहे. बिहारच्या जनतेने विकासाला, विश्वासाला आणि विकसित भारताकरिता महत्व दिले आहे आणि त्यामुळे एक मोठा अभूतपूर्व विजय आहे. बिहारच्या इतिहासात यापूर्वी कधीही मिळालेलं नाही तेवढं बहुमत एनडीएला मिळताना दिसत आहे. बिहारच्या राजकारणात हा मोठा ऐतिहासिक विजय आहे. भारताच्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे, 40 कोटींचा देश मोदींच्या मागे उभा आहे. -काँग्रेस रोजच कमजोर होत चालली आहे, राहुल गांधी यांचा नेतृत्व हतबल झालेला आहे केवळ आपले नेतृत्व आणि पक्ष टिकवण्याकरिता मतदार यादी, ईव्हीएम यावर दोष देऊन या ठिकाणी करत आहेत. विकासाचा त्यांच्याकडे अजेंडा नाही समाजात तेढ निर्माण करणे , 2029 मध्ये काँग्रेस ही सगळ्यात छोटी पार्टी होईल अशी टीका बावनकुळे यांनी काँग्रेसवर केली आहे.

बिहारमध्ये पुन्हा नवीन ट्विस्ट, JDU 12 जागांवर 1,000 पेक्षा कमी मतांनी आघाडीवर

2047 पर्यंत आमचा गठबंधन केंद्रात आणि राज्यात : चंद्रशेखर बावनकुळे

नितीश कुमार यांनी विकसित बिहार म्हटलं, राहुल गांधी आणि त्याचा कुठेही उल्लेख केला नाही म्हणून बिहारच्या जनतेने काँग्रेसला नाकारलं. भाजप आणि मित्र पक्षांवर जनतेचा विश्वास आहे, महाराष्ट्राची जनता देखील डबल इंजन सरकारवर विश्वास ठेवते आहे. विकसित महाराष्ट्र करण्याच्या संकल्प जनतेने केल्यामुळे जनता आमच्यावर विश्वास ठेवणार. आमचा एनडीए मजबूत होईल आम्ही देशात एनडीए मध्ये जातोय या निकालामुळे एनडीएची ताकद अजून वाढली आहे. 2047 पर्यंत आमचा गठबंधन केंद्रात आणि राज्यात राहील असा विश्वास देखील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

follow us